• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

Admin by Admin
June 5, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अगदी क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, खुनाच्या घटना राज्यात ठिकठिकाणी रोज घडत असल्याचे समोर येत आहे. यातच सांगली शहरामध्ये एका भाजी विक्रेत्या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

महेश कांबळे हा भाजी विक्रेता आहे. २०२१ मध्ये त्याने फिरोज उर्फ बडे शेरअली शेख (वय ४५, रा. जुना कुपवाड रस्ता, सांगली) याचा खून केला होता. मृत फिरोजच्या मुलाने साथीदारासह महेशचा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असले तरी अनैतिक संबंधाची किनार देखील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

महेश कांबळे हा भाजी विक्रेता आहे. आर्थिक वादातून त्याने २०२१ मध्ये फिरोज शेख याचा खून केला होता. संजयनगर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होता. २०२३ मध्ये महेश हा जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो पुन्हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. गुरूवारी सकाळी तो शंभर फुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात गेला होता. त्यावेळी फिरोज याचा मुलगा व अन्य साथीदार त्याच्या मागावर होते. त्यानी दुचाकी शोरूमजवळ महेशवर हल्ला चढवला. हल्ल्यात महेश गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर हल्लेखोर पळाले.

ADVT.

हल्ल्यानंतर भाजी बाजारात पळापळ झाली. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय मोरे पथकासह धावले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके पाठवली.

प्राथमिक तपासात वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून फिरोज याने साथीदारासह खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतू त्याचबरोबर खून करण्यास अनैतिक संबंधाची किनार असल्याचे कारण पुढे येत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने देखील पोलिस तपास करत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग | अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

Next Post

मोठी बातमी | मिरजेतील तणाव तब्बल चार तासांनी निवळला, पोलिसांची यशस्वी भूमिका, तातडीने निर्णय..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | मिरजेतील तणाव तब्बल चार तासांनी निवळला, पोलिसांची यशस्वी भूमिका, तातडीने निर्णय..!

मोठी बातमी | मिरजेतील तणाव तब्बल चार तासांनी निवळला, पोलिसांची यशस्वी भूमिका, तातडीने निर्णय..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group