• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

Admin by Admin
June 4, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने लगट वाढवून अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या टोळीने तारदाळ येथील व्यावसायिकाकडे ३ कोटींची खंडणी मागितली.

याप्रकरणी स्नेहा संजय नारकर (वय ३५, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) हिच्यासह पाच जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्यावसायिक आनंद श्रीनिवास मर्दा (वय ४७, रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) यांनी सोमवारी (दि. २) रात्री उशिरा फिर्याद दिली.

नारकर हिच्यासह शांताबाई वाळकुंडे (रा. यशवंतनगर, इचलकरंजी), संतोष पाटील (रा. चिपरी, ता. शिरोळ), शेखर गाडेकर (रा. जयसिंगपूर) आणि रामचंद्र (नारकर हिच्या कारवरील चालक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मर्दा यांची तारदाळ येथे सायझर्स कंपनी आहे. स्नेहा नारकर हिने प्रवासात ओळख वाढवून आपण कोल्हापुरातील एका बँकेत क्रेडिट मॅनेजर पदावर काम करीत असल्याचे सांगितले.

ADVT.

व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासह बँकांकडे तारण असलेले सोने लिलावात कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिने संपर्क वाढवला. त्यानंतर काही दिवसांत तिने मर्दा यांच्याकडे ३ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

पैसे न दिल्यास दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून त्रास देण्याची धमकी तिने दिली. हा प्रकार १२ ते २५ मे २०२५ या काळात घडला. नारकर हिला दुसऱ्या गुन्ह्यात लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली असून, तिचा ताबा घेतला जाईल, तसेच इतर आरोपींचाही शोध सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली.

पाच जणांची टोळी

या गुन्ह्यात नारकर हिच्यासह पाच जणांचा सहभाग आहे. त्यांना अटक करून गुन्ह्यातील सहभाग तपासला जाणार आहे. या टोळीने आणखी काही जणांना गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी फिर्याद द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नारकर हिच्यावर दुसरा गुन्हा

जयसिंगपूर येथील नितीन जंगम यांना दीड कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४३ लाख ७४ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी नारकर हिच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात तिला अटक झाली आहे. तिच्यावर राज्यात इतर ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

Next Post

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group