• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | दत्तवाड येथील दूधगंगा नदीवरील दोन्ही बंधारे पाण्याखाली, वाहतूक ठप्प

Admin by Admin
May 27, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | दत्तवाड येथील दूधगंगा नदीवरील दोन्ही बंधारे पाण्याखाली, वाहतूक ठप्प
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मागील पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दूधगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे या नदीवरील महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणारे दत्तवाड – एकसंबा व दत्तवाड – मलिकवाड ही दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यातून या मार्गावरून सुरू असलेली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

जवळचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात दोन्ही राज्यातून नेहमी वाहतूक सुरू असते. मात्र, बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दोन्ही राज्यातील नागरिकांना किमान पाच ते सात किलोमीटर अधिक अंतरावरून प्रवास करावा लागणार आहे.

सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून अशीच वाढ सुरू राहिल्यास लवकरच नदीकाठची गवताची कुरणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची नदीकाठची वीजपंप सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी एकच धांदल उडाली आहे.

Previous Post

ब्रेकींग | मंत्रालयात पाणी शिरले, कर्मचाऱ्यांची तारांबळ; शासकीय वाहने बुडाली पाण्यात

Next Post

धक्कादायक | कोल्हापुरात विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले असे काही, शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पालकमंत्रीही झाले अवाक..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक | कोल्हापुरात विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले असे काही, शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पालकमंत्रीही झाले अवाक..?

धक्कादायक | कोल्हापुरात विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले असे काही, शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पालकमंत्रीही झाले अवाक..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group