• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक | कोल्हापुरात विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले असे काही, शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पालकमंत्रीही झाले अवाक..?

Admin by Admin
May 27, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
धक्कादायक | कोल्हापुरात विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले असे काही, शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पालकमंत्रीही झाले अवाक..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कोल्हापूर शहरातील खरी कॉर्नर परिसरातील एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याच्या दप्तरात काही भयानक गोष्टी सापडल्याची खरी वस्तुस्थिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी सांगितले आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे देखील अवाक झाले.

जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीदरम्यान यामुळे वातावरण बदलले आणि याबाबत चिंता व्यक्त करताना उपाय योजनांबाबतही चर्चा करण्यात आली.

माध्यमिक शिक्षण विभागाचा आढावा सुरू असताना पालकमंत्र्यांनी माध्यमिक शाळांची अवस्था पाहिल्यानंतर काही गोष्टींबाबत त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. तंबाखुमुक्त शाळा धोरणाची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना पालकमंत्री करत असतानाच डॉ. आंबोकर यांनी हा प्रकार सांगितला. याच शाळेतील काही मुलांच्या दप्तरात ई सिगारेट, खिशात हजार, दीड हजार रूपये सापडले. त्यांच्या पालकांना बोलावून विचारणा केली असता आम्ही पैसे दिले नव्हते. यांच्याकडे पैसे कुठून आले. आम्हालाही माहिती नसल्याचे सांगितले.

हे ऐकल्यानंतर मात्र पालकमंत्र्यांनी अशा परिस्थितीत आपल्या सर्वांचीच जबाबदारी वाढली असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, व्यसनविरोधी वातावरण तयार करण्यासाठी मेळावे घ्या. मुलांना, पालकांना बोलवा. या क्षेत्रातील समुपदेशकांना निमंत्रित करा. याच वयात मुलांना काही चांगल्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक सांगितल्या पाहिजेत. पालकही मुले शाळेला गेलीत म्हणून निवांत राहतात. त्यांनाही जबाबदारीची जाणीव करून द्या.

पानपट्टीवाल्यांना हात करून जातात

आबिटकर म्हणाले, शाळांच्या १०० मीटरच्या आवारात तंबाखू विक्री असू नये असा शासनाचा नियम आहे. परंतु अनेक शिक्षकच पानपट्टीवाल्याला हात करत ‘कसं काय बरं हाय का’ असे विचारत जातात. हे बरोबर नाही. याबाबत ठोस काही तरी कृती कार्यक्रम करा अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

Previous Post

ब्रेकिंग | दत्तवाड येथील दूधगंगा नदीवरील दोन्ही बंधारे पाण्याखाली, वाहतूक ठप्प

Next Post

संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित, यंत्रणा सज्ज..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित, यंत्रणा सज्ज..!

संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित, यंत्रणा सज्ज..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group