• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीजवळ होणार मोठा बंधारा..!

Admin by Admin
May 27, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीजवळ होणार मोठा बंधारा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

म्हैसाळ सिंचन योजनेला आवश्यक असलेल्या बंधारा उभारणीचे काम म्हैसाळ (ता. मिरज) येथे गतीने सुरू आहे. त्यापद्धतीने सांगलीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी व महापुराचे नियंत्रण करण्यासाठी सांगलीजवळ अर्धा टीएमसी क्षमतेचा बंधारा बांधण्यात येणार आहे.

सांगलीत सध्या जो बंधारा आहे, त्याला लागूनच हा बंधारा होणार असून त्याची निविदा लवकरच निघणार आहे.

सांगली शहर कृष्णा नदीकाठावर आहे. तरीसुद्धा अनेकदा शहराला पाणीटंचाई जाणवत असते. उन्हाळ्यामध्ये नदीकाठावरील गावांतून व सिंचन योजनांमुळे नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होतो. त्यामुळे शहराला पाणीटंचाई जाणवत असते. अनेकदा दूषित पाणी पुरवठा होतो. सध्या जो बंधारा आहे, तो छोटा असून स्वयंचलित नाही. त्यामुळे पाणी अडवण्यासाठी किंवा सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला खूप कसरत करावी लागते.

गेल्या काही वर्षांपासून कृष्णा व तिच्या उपनद्यांना सातत्याने महापूर येत आहे. या महापुराचा फटका सांगली शहराला मोठ्या प्रमाणात बसतो. त्यामुळे महापुराच्या उपाययोजनांमध्ये सांगली शहरात अर्धा टीएमसी क्षमतेचा बंधारा उभारण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला जागतिक बँकेकडून मंजुरी मिळालेली आहे. त्यानुसार 224 कोटी रुपये खर्चून हा बंधारा उभारण्यात येणार आहे. सध्या जो कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे, त्याच्या खालील बाजूस हा नवीन बंधारा उभारण्यात येणार आहे. त्याचे दरवाजे हायड्रोलिक असणार आहेत. त्यामुळे पाणी अडवणे किंवा सोडणे सुलभ होणार आहे. याशिवाय या बंधार्‍यावरून सांगली ते सांगलवाडीकडे ये-जा करण्यासाठी सुलभ रस्ता होणार आहे. सध्या जो कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे, त्याच्या दहापट पाणी साठवणूक करण्याची क्षमता या नवीन बंधार्‍यामध्ये असणार आहे. त्याशिवाय या बंधार्‍यामुळे डिग्रज, नागठाणेपर्यंत पाणीसाठा होणार आहे.

ज्योती देवकर कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, सांगलीसांगलीजवळ नवीन बंधारा बांधण्याबाबत प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या बंधार्‍यामुळे शहराचा पाणीप्रश्न सुटणार आहे. त्याशिवाय महापूर नियंत्रणासाठी याचा उपयोग होणार आहे.

Previous Post

ब्रेकिंग | मिरजेतील डॉक्टरला अटक : परिचारिकेवर बलात्कार, सर्वत्र जोरदार चर्चा..!

Next Post

तासगाव तालुक्यातून अवैध धंद्यांचे उच्चाटन करणार – आमदार रोहित पाटील

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तासगाव तालुक्यातून अवैध धंद्यांचे उच्चाटन करणार – आमदार रोहित पाटील

तासगाव तालुक्यातून अवैध धंद्यांचे उच्चाटन करणार - आमदार रोहित पाटील

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group