मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज शासकीय रुग्णालयातून ३ दिवसाचे चोरीला गेलेले नवजात बाळ ४८ तासात शोधून काढल्याबद्दल गांधी चौकी पोलिसांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले.

महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिड्डे व त्यांच्या सर्व टीमचा युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत व शिवसेना मिरज शहर संघटक बाळासाहेब हत्तेकर व पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी युवासेना मिरज शहर उपप्रमुख अनिकेत वायदंडे, युवासेना विभाग प्रमुख प्रथमेश यमगार, युवासेना मिरज शहर समन्वयक लखन भोरे, उपशहर संघटक शुभम कांबळे व शिवसैनिक उपस्थित होते.