खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज तालुक्यातील ६८ रेशनिंग दुकानासाठी प्रति महिना ७ हजार ३९० क्विंटल गहू तांदळाचे वितरण मिरज शासकीय गोदामातून केले जात असून प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थी कार्डधारकांना रेशन दुकानदार धान्य व्यवस्थित देतात की नाही, याबाबतची तक्रार द्यावयाची असेल तर https://mahafood.gov.in/about-department/ या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रारी अर्ज देण्याच्या सूचना गोदाम व्यवस्थापक रघुनाथ कोळी यांनी ‘गोपनीय खबऱ्या‘शी बोलताना सांगितल्या आहेत.

मिरज तालुक्यातील ६८ धान्य दुकानासाठी प्रत्येक महिन्याच्या सहा तारखेपासून शासकीय गोदामातून धान्य वितरीत केले जाते. मिरज शासकीय गोदामाची धान्य वितरण व्यवस्था उत्कृष्ट व्यवस्थापन असल्याने तालुक्यातील प्रत्येक रेशन दुकानांना वेळेवर धान्य पुरवठा वितरित केला जातो.

प्राधान्य कुटुंबातील कार्डधारक लाभार्थ्यांना प्रत्येक व्यक्तीसाठी दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ दिला जातो. अंत्योदय लाभार्थ्यांना १५ किलो गहू व २० किलो तांदूळ दिला जातो. चालू मे महिन्यासाठी प्राधान्य कुटुंबांसाठी २५९५.६२ क्विंटल गहू व ३८९३.४३ क्विंटल तांदूळ तर अंत्योदय लाभार्थ्यांसाठी ३८५.८० क्विंटल गहू व ५१४.४० क्विंटल तांदूळ विक्रीत होत आहे.
तालुक्यातील ६८ रेशन दुकानदारांना मिरज शासकीय गोदामातून धान्य विक्रीत केली जाते तर शहरातील ६८ रेशन दुकानदारांना मिरज सेंट्रल वेअर हाऊस गोदामातून धान्याचे वितरण केले जाते ४८,५०५ कार्डधारक मोफत धान्याचा लाभ घेतात.
वितरित होणारे धान्य लाभार्थ्यांना व्यवस्थित मिळते का.? तसेच रेशन दुकानदार कितपत प्रामाणिक वागतात.? याबाबत जर का तक्रारी असतील तर ऑनलाईन अर्ज करून संकेतस्थळावर तक्रारी दाखल कराव्यात, असे गोदाम व्यवस्थापकाकडून सुचित करण्यात आले आहे.