• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक ब्रेकिंग | मिरजकरांनो, तुमचा पोरगा काय करतोय.. लक्ष आहे का..? खुट्टयातून वर न आलेल्या अन् मिसरूट उगवलं नसलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अटक.

Admin by Admin
March 14, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
धक्कादायक ब्रेकिंग | मिरजकरांनो, तुमचा पोरगा काय करतोय.. लक्ष आहे का..? खुट्टयातून वर न आलेल्या अन् मिसरूट उगवलं नसलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अटक.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

भारत सरकारच्या ‘नशामुक्त भारत’ या अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलिसांनी अंमली पदार्थावर बडगा उगारत मोठी कारवाई केली आहे. गांजासारख्या अंमली पदार्थावर अल्पावधीत चौथी कारवाई करत तब्बल दोन किलो सातशे ग्रॅम वजनाचा सुमारे ६७ हजार ५१० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. हा गांजा तीन अल्पवयीन मुलांकडून ताब्यात घेण्यात आला आहे. सदरची कारवाई मिरजेतील रॉकेल डेपो झोपडपट्टी येथे करण्यात आली आहे.

महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे कर्तबगार पथक

महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, तीन अल्पवयीन बालके सदरचा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने येत असल्याची माहिती मिळाली. याच मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित तीन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून सुमारे दोन किलो सातशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने एक महिन्याच्या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी कारवाईत लक्षणीय सातत्य राखून चौथी प्रभावी कामगिरी केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, हेड कॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सुरज पाटील, अभिजीत पाटील, जावेद शेख, मोहसीन टिनमेकर, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, राजेंद्र हारगे, निवास माने यांनी केली आहे.

Previous Post

सांगली-मिरज- कुपवाड महापालिकेचे बजेट जाणार १ हजार कोटींवर

Next Post

ब्रेकिंग | पोलिस ॲक्शन मोडवर..! जर्मनी टोळीच्या एकाला इचलकरंजी पोलिसांनी घटनास्थळी फिरवले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

ब्रेकिंग | पोलिस ॲक्शन मोडवर..! जर्मनी टोळीच्या एकाला इचलकरंजी पोलिसांनी घटनास्थळी फिरवले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group