• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | ईव्हीएम विरोधात ग्रामसभेत ठराव, मतदानावर बहिष्काराचा इशारा

Admin by Admin
February 12, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | ईव्हीएम विरोधात ग्रामसभेत ठराव, मतदानावर बहिष्काराचा इशारा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

“आमच्या गावातील कोणत्याही संस्थेच्या किंवा सार्वजनिक निवडणुकीत EVM मशीनचा वापर करू नये, आमच्या ग्रामसभेचा अपमान करून EVM मशीन लादली गेली, तर आम्ही बहिष्कार घालू.”

सांगलीमधील वाळवा तालुक्यातील बहे ग्राम पंचायतीनं अशी ठाम भूमिका घेतली आहे. या ठरावाची प्रत बहे ग्रामपंचायतीच्या वतीनं इस्लामपूर तहसीलदारांकडे सुपूर्द देखील करण्यात आली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा तालुका म्हणून वाळवा तालुका क्रांतिभूमी म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील बहे गावामध्ये EVMच्या विरोधात ठिणगी पडली आहे.

EVM ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ऐतिहासिक ठराव गावानं घेतला आहे. इतकंच नव्हे तर सरकारनं याकडं दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा देखील ठराव संमत केलाय. ग्रामसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलेला सदर ठराव हा इस्लामपूरच्या तहसीलदारांना देखील सुपूर्द करण्यात आला आहे.

  • ‘क्रांतिसिंह नाना पाटलांकडूनच मिळाला क्रांतीचा वारसा’

वाळवा तालुक्यातील बहे हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं जन्मगाव. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारनं ब्रिटिश राजवटीला सळो-की-पळो करून सोडलं होतं. ही या तालुक्याची ओळख मानली जाते. त्यामुळे लोकशाहीच्या संवर्धनासाठी क्रांतिसिंह पाटलांकडून प्रेरणा घेऊन आपण EVM विरोधात पाऊल उचलले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

10 जानेवारी रोजी बहे गावच्या ग्रामपंचायतीनं ग्रामसभेमध्ये एकमतानं EVM वर मतदान घेऊ नये, असा ठराव 10 जानेवारी रोजी तहकूब झालेल्या ग्रामसभेत केला आहे. बहे गावची लोकसंख्या 3 हजार 500 इतकी आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं एक सधन गाव म्हणून त्याची ओळख आहे.

Previous Post

Sangli news | शक्तिपीठ रद्दसाठी महिलांचा एल्गार; रक्ताने पत्र लिहीत लाडक्या मुख्यमंत्री भावाला साद

Next Post

सांगलीतील ‘या’प्रकरणी चौकशी होणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आश्वासन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीतील ‘या’प्रकरणी चौकशी होणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आश्वासन

सांगलीतील 'या'प्रकरणी चौकशी होणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आश्वासन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group