सरकारी कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागाने दणका देत जिल्ह्यातील 4 हजार सरकारी कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द केले आहेत.
Chhatrapati Sambhajinagar – सरकारी कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द केले आहेत. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरीब लाभार्थींना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. ते धान्य अत्यल्प दरात पुरविले जाते. मात्र चांगला पगार असलेले सरकारी कर्मचारी देखील या गरिबांच्या अन्नधान्यावर डल्ला मारत असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. धान्य वाटपाचा लाभ जिल्ह्यातील असंख्य शासकीय कर्मचारी घेत होते. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागांनी विशेष मोहीम राबवून पडताळणी केली. या पडताळणीनंतर जिल्ह्यातील 4 हजार 427 शासकीय कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द केले आहेत.


