कुपवाड प्रतिनिधी | कुपवाडमध्ये मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने सोमवारी पत्रकारदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर आजअखेरही पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी केले.
कुपवाड मधील अकुज ड्रीमलँड येथे पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दीपक भांडवलकर बोलत होते. सुरूवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दीपक भांडवलकर पुढे म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पोलिस प्रशासन आणि पत्रकार यांचे समाजात मोलाचे योगदान असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षकतज्ञ, जेष्ट पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते. 6 जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ मराठी वृत्तपत्राच्या पहिला अंक त्यांनी प्रकाशित केला. हा दिवस दर वर्षी महाराष्ट्र राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत कुपवाड मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दरिकांत माळी यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुणे सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर व माजी नगरसेवक गजानन मगदूम यांचा पत्रकार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त पत्रकार दरिकांत माळी, बाळासाहेब मलमे, अभिजित परीट,मच्छिंद्र कांबळे,हुसेन मगदूम,पत्रकार श्रीकांत मोरे, महालिंग सरगर, ऋषिकेश माने, प्रविण मिरजकर, नजीर बारगिर,संदीप कांबळे,समाधान धोतरे, उदय मोहिते, अजय माने,अमोल हांडे सामाजिक कार्यकर्ते हणमंत सरगर,मनोज अदाटे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार भारत कांबळे यांनी केले तर आभार पत्रकार अभिजीत परीट यांनी मानले.