- आयजी ऑफिस पुण्याला नको
आमदार सत्यजित देशमुख यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्याला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावरून राजकारण तापल्याचे सांगत हे कार्यालय कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा महत्वाच्या आणि कारखानदारी असणाऱ्या जिल्ह्यांसाठी महत्वाचे असल्याचे सांगितले. येथे प्रतिवर्षी उसदरावरून वातावरण तापलेलं असते. त्यामुळे हे कार्यालय पुणे येथे स्थलांतरीत न करता ते कोल्हापुरमध्येच ठेवण्यात यावे यासाठी सरकारला सभागृहाने आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी केली आहे.