• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महिला आयोग आपल्या दारी : रुपालीताई चाकणकर यांची प्रसिद्ध हजरत शमनामीरा दर्गाहस्थळी भेट.

Admin by Admin
December 21, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
महिला आयोग आपल्या दारी : रुपालीताई चाकणकर यांची प्रसिद्ध हजरत शमनामीरा दर्गाहस्थळी भेट.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | राज्यातील ग्रामीण, शहरी, वाड्या-वस्त्यावरील पिडीत, अर्जदार महिलांपर्यंत आयोग पोहोचावा तसेच पिडितांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राबविला जात असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मिरजेतील प्रसिद्ध हजरत शमनामीरा दर्गाहस्थळी भेट दिली. याप्रसंगी शहरातील महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी चाकणकरांनी आयुक्तांशी यासंदर्भात बोलून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

सांगली मध्ये जनसुनावणी नंतर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीत विविध विभागांचे सादरीकरण झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील बाल विवाह बाबत, गर्भलिंग निदान कायदा अंमलबजावणी यासाठी मोठ्या प्रमाणावर काम प्रशासनाकडून व्हावे यासाठी सूचना दिल्या. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती बाबत शोध मोहीम हाती घेण्याचे निर्देशही दिले. शाळेतून मुलींची पटसंख्या कमी होणाऱ्या तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

यावेळी मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक अतहर नाईकवडी, जमील बागवान, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी यांच्यासहित दर्गाह कमिटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

तुकडेबंदी! १ गुंठा, 2 गुंठे, ३ गुंठे धारकांना होणार मोठी मदत…

Next Post

‘वाल्मिक कराडनं 32 खून केले’; आमदार उत्तमराव जानकरांचा आरोप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘वाल्मिक कराडनं 32 खून केले’; आमदार उत्तमराव जानकरांचा आरोप

'वाल्मिक कराडनं 32 खून केले'; आमदार उत्तमराव जानकरांचा आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group