• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | पन्नास हजाराच्या लाचेची मागणी, एपीआय’सह तिघे पोलिस एसीबीच्या जाळ्यात

Admin by Admin
December 19, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | पन्नास हजाराच्या लाचेची मागणी, एपीआय’सह तिघे पोलिस एसीबीच्या जाळ्यात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गांधीनगर पोलिस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दीपक शंकर जाधव (वय ४४, रा. बापट कॅम्प) याच्यासह उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे (रा. निगडेवाडी, उचगाव, ता. करवीर) आणि कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे (वय ३३, रा.शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) हे तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.

गुन्ह्यात जप्त केलेला टेम्पो परत देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. एपीआय जाधव आणि कॉन्स्टेबल कांबळे यांना पथकाने ताब्यात घेतले. तर पीएसआय शिरगिरे पळून गेला. गुरुवारी (दि. १९) दुपारी गांधीनगर पोलिस ठाण्यात ही कारवाई झाली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव याने गेल्या महिन्यात जनावरांची अवैध वाहतूक करणा-या संशयितांवर कारवाई केली होती. त्या गुन्ह्यात जप्त केलेला टेम्पो परत देण्यासाठी त्यांनी टेम्पो मालकाकडे लाचेची मागणी केली होती. दरम्यान, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सात डिसेंबरला जाधव यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षाकडे बदली केली होती.

कार परत मिळावी यासाठी तक्रारदार गांधीनगर पोलिस ठाण्यात चकरा मारत होता. त्याच्याकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून जाधव आणि कांबळे या दोघांना अटक केली. कारवाईची चाहूल लागताच उपनिरीक्षक शिरगिरे पळून गेला. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Previous Post

ब्रेकिंग | शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या वर्षातून एकदाच, विधेयक मंजूर

Next Post

तुकडेबंदी! १ गुंठा, 2 गुंठे, ३ गुंठे धारकांना होणार मोठी मदत…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तुकडेबंदी! १ गुंठा, 2 गुंठे, ३ गुंठे धारकांना होणार मोठी मदत…

तुकडेबंदी! १ गुंठा, 2 गुंठे, ३ गुंठे धारकांना होणार मोठी मदत...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group