• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गोपिचंद पडळकरांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले, फडणवीसांचे विश्वासू म्हणून होती मोठी अपेक्षा

Admin by Admin
December 15, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
गोपिचंद पडळकरांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले, फडणवीसांचे विश्वासू म्हणून होती मोठी अपेक्षा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

घटना किंवा स्टेटमेंट कोणत्याही विरोधकाचं असो, त्यावर गोपिचंद पडळकरांचा प्रतिवाद ठरलेला असतो. गेल्या पाच-दहा वर्षांपासून गोपिचंद पडळकर हे महाराष्ट्राच एक चर्चेतलं नाव झालंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरील टीका असो की राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याशी रंगलेला कलगीतुरा असो… या ना त्या कारणाने पडळकर प्रसारमाध्यमांमध्ये कायम असतात.

वंचित बहुजन आघाडीतून भाजपात आलेल्या हा नेता सध्या भाजपची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखला जातो. अभिनेता ते नेता असा त्यांचा जिवनप्रवास आहे. त्यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा रगंली होती. परंतु, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यांचे मंत्री होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले.

पडळकर धनगर समाजाचे नेते

गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या पार्टीशी वाद झल्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीते गेले होते. मात्र तेथे जास्त रमले नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा भाजपमध्ये आले. विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना विधानपरिषदेला संधी दिली.

पडळकर आणि वाद

पडळकरांचं वक्तव्य आणि वाद हे समिकरणच झालं आहे. शरद पवारांवर ते विखारी टिका करतात. गेल्या आठवड्यातच त्यांनी 100 शकुनी मेल्यावर शरद पवार जन्माला आले असं म्हटलं होतं. त्यापूर्वी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं होतं. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरूनही पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यावरून अनेकदा वाद झाले आहेत.

Previous Post

ब्रेकिंग! सोलापुरात अर्धनग्न अवस्थेत मुलीसमोर थांबून विचित्र कृत्य

Next Post

ब्रेकिंग | ‘तुम्ही हे केले असते तर..’ तासगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | ‘तुम्ही हे केले असते तर..’ तासगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित..!

ब्रेकिंग | 'तुम्ही हे केले असते तर..' तासगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group