कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून फिर्यादी आणि आरोपी यांनी एकमेकांवर गोळीबार केल्याचे समोर येत असून पोलिसांनी यात एक जणास ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील आदमापूर परिसरात सकाळच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. यात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यातील फिर्यादी असलेला विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी आणि आरोपी अनिकेत कांबळे यांनी एकमेकांवर गोळीबार केला आहे. दरम्यान या गोळीबारात कोणीही (Crime News) जखमी झाले नाही. मात्र आदमापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलिसांनी घेतले ताब्यात
पूर्वव्यमानस्यातून गोळीबार झाल्याचे प्राथमिक माहिती असून आदमापूर परिसरात झालेल्या गोळीबार करणारा विनायक लाड याला भुदरगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून रिवाल्वर देखील जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपस करत आहेत.

