जिल्ह्यात आज, बुधवार (दि.२०) मतदारांनी मतदानासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. सकाळी मिरज मतदारसंघात सुरुवातीला चुरशीने आणि सध्या शांततेत परंतु अगदी संथ गतीने मतदान झाले आहे.
मिरज मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३०.८३ % मतदान झाले आहे.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली. मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुरेशभाऊ खाडे व पत्नी यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, राज्यात जोरदार चुरस होत आहे. मतदानाची टक्केवारी खूपच कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करा अशी विनंती अनेक सेलिब्रिटींनी केली. दरम्यान, आजच्या मतदासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी मतदान केले आहे.

