• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Admin by Admin
November 15, 2024
in राजकीय
1 min read
0
Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi News: विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहचलाय. प्रचारासाठी राजकीय पक्षाकडे आता फक्त चार दिवसांचा वेळ शिल्लक राहिलाय.१५ ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता लागू कऱण्यात आली, तेव्हापासून राज्यात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५३६ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये पैसे, दारु, अमली पदार्थ, मौल्यवान धातू यासह विविध बाबींचा समावेश आहे.

महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडत आहे. निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाने राज्यात आचारसंहिता लावली आहे. आयोगाकडून राजकीय पक्ष आणि नागरिकांसाठी काही नियम घालून दिले आहेत. मात्र, याचं काही जणांना भान नाही. महिनाभरात राज्यात ६ हजारांपेक्षा जास्त आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्याशिवाया आयोगाकडून ५३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ६ हजार ३८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ६ हजार ३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात.

तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

Previous Post

पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची धमक – बाळासाहेब थोरात

Next Post

१५ नोव्हेंबरपासून कुंभ राशीत शनिदेव करणार चाल.! ‘या’ राशींनी जरा जपूनच..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
१५ नोव्हेंबरपासून कुंभ राशीत शनिदेव करणार चाल.! ‘या’ राशींनी जरा जपूनच..

१५ नोव्हेंबरपासून कुंभ राशीत शनिदेव करणार चाल.! 'या' राशींनी जरा जपूनच..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group