• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | ‘या’ मतदारसंघात जातीय वादाचे समीकरण, लक्षवेधी लढत..!

Admin by Admin
November 15, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
आम्हाला ‘हा’ नेता मुख्यमंत्री पाहिजे..! शिंदे, फडणवीस, ठाकरे नव्हे तर राज्यातील मतदारांना पाहिजे असलेला नेता कोण.. ? वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली जिल्ह्यातील सर्वात जोरदार लढत होत असलेल्या जत मतदारसंघामध्ये दोन आमदार आणि भाजप बंडखोर यांच्यात होत असलेली तिरंगी लढत जिल्ह्यात लक्षवेधी ठरली आहे. निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जातीयवादाकडे झुकू पाहणारी ही निवडणूक भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा या पातळीवर आली असून काँग्रेसच्या विद्यामान आमदारांवर निष्क्रियतेचा आरोप करत मतदान मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या निवडणुकीत आमदार विश्वजित कदम यांची आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासाठी, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत स्वाभिमानी विकास आघाडीच्या झेंड्याखाली तमणगोंडा रविपाटील यांना पुढे करून अजूनही आपले मतदारसंघावर वर्चस्व असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न चालविला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये राजकीय पेरणी सुरू केली. आमदारपदाची मुदत अजून अडीच वर्षे शिल्लक असताना जतची उमेदवारी भाजपने त्यांना दिली. गेल्या चार वर्षांपासून जतमध्ये विधानसभेसाठी तयारी करत असलेल्या तमणगोंडा रविपाटील यांना मात्र बाजूला करण्यात आले. यातून तालुक्याचा स्वाभिमान म्हणून माजी आमदार जगताप यांनी बंडखोरीचे नेतृत्व हाती घेत काँग्रेस व भाजपसमोर आव्हान उभे केले आहे.

पडळकर आटपाडीतील असल्याने भूमिपुत्र विरोधात पार्सल असा प्रचार सुरू आहे, तर काँग्रेस आमदार सावंत यांनी तुबची-बबलेश्वरचे पाणी आणल्याचे भांडवल करत मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. तालुक्याचे राजकारण जातीयवादावर जात असल्याचा बंडखोरांचा आक्षेप असून यापूर्वी अशी स्थिती कधीही नव्हती असा दाखला दिला जात आहे.

Previous Post

आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नका – पंकजा मुंडे

Next Post

जिल्ह्यात आज उडणार प्रचाराचा जोरदार धुरळा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्ह्यात आज उडणार प्रचाराचा जोरदार धुरळा

जिल्ह्यात आज उडणार प्रचाराचा जोरदार धुरळा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group