सांगली प्रतिनिधी | एकीकडे मराठा आरक्षण दुसऱ्या बाजूने ओबीसीचा मुद्दा आणि तिसऱ्या बाजूला धनगर आरक्षण राज्यात होता. मात्र हे सगळे पाहता भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ही सगळी रिझर्वेशन कुजवण्याचं काम केलं असल्याचा आरोप माजी समाजकल्याण मंत्री काँग्रेस नेते चंद्रकांत हांडोरे यांनी भाजपवर केला.
विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सांगली येथे झालेल्या प्रचार सभेदरम्यान त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हांडोरे म्हणाले कि, राहुल गांधी यांनी एक घोषणा केलेली आहे. त्यासाठी देशभर जातीनिहाय जनगणनेबाबत सूतोवाच केले आहे. कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये अशा पद्धतीच्या जाती निहायं जनगणना सुरू झाली असल्याचे ते म्हणाले.
- राज्यातही जातीनिहाय जनगणना करू
महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यानंतर जातीनिहाय जनगणना आम्ही सुरू करू आणि ज्या ज्या जातीचं लोकसंख्या जेवढी आहे. त्यांना त्या पद्धतीने रिझर्वेशनसाठी आमचं सरकार केंद्राकडे त्यासाठी शिफारस करणार आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचेच इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात असणार आहे. त्यावेळेस देशभर या संबंधांमध्ये भूमिका आम्ही ठेवणार आहोत; असेही चंद्रकांत हांडोरे म्हणाले.

