• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | मिरजेत भाजप नेत्याचा निर्घृण खून, आरोपी ताब्यात..! सर्वत्र खळबळ…

Admin by Admin
November 9, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | मिरजेत भाजप नेत्याचा निर्घृण खून, आरोपी ताब्यात..! सर्वत्र खळबळ…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या | मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व भाजप स्टार्ट अप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा शेत जमिनीच्या वादातून मानेवर कुऱ्हाडीने घाव घालत निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांवर गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांनी अटक केली.

सुधाकर खाडे यांनी मिरजेत पंढरपूर रस्त्यावर राम मंदिरालगत चंदनवाले मळा येथील पावणेचार एकर जमीन सचिन जगदाळे यांच्याकडून विकसनासाठी घेतली होती. मात्र यास लक्ष्मण चंदनवाले यांनी हरकत घेतल्याने गेले काही महिने खाडे यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू होता. या जागेवर कुंपण घालण्यासाठी सुधाकर खाडे, आप्पा ओतारी, ओंकार पवार यांच्यासह आठ ते दहा साथीदारांसोबत गेले होते. यावेळी शेत जमिनीचे कब्जे धारक चंदनवाले कुटुंबीय व सुधाकर खाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली.

यावेळी रागातून कार्तिक चंदनवाले याने कुऱ्हाडीने अचानक मागून सुधाकर खाडे यांच्या मानेवर हल्ला केला. कुऱ्हाडीचा मानेवर वर्मी घाव बसल्याने खाडे यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी खाडे यांच्या साथीदारांवर हल्ला चढविल्याने तेथे मोठा गोंधळ उडाला होता. खाडे यांना मिरजेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.

खुनानंतर कार्तिक चंदनवाले या आरोपीस पोलिसांनी अटक केली. दरम्यान सुधाकर खाडे यांच्या खुनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. खाडे यांच्या खुनाच्या घटनेचे मोबाईलवर चित्रण झाले आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात कार्तिक चंदनवाले, लक्ष्मण चंदनवाले, शंकर चंदनवाले, काशिनाथ चंदनवाले यांच्यासह तीन महिलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मोठी बातमी! मोदी, शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, सांगलीत भाजपला मोठा धक्का, बडा नेता काँग्रेसमध्ये..!

Next Post

मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!

मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या 'या' उमेदवाराला जाहीर पाठिंबा!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group