• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी! मोदी, शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, सांगलीत भाजपला मोठा धक्का, बडा नेता काँग्रेसमध्ये..!

Admin by Admin
November 9, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान मतदानाला अवघे काही दिवस बाकी असतानाच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. सांगलीमध्ये भाजपला खिंडार पडले आहे. भाजपचा सांगलीमधील अल्पसंख्यांक चेहरा असलेले नेते मुन्ना कुरणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीमध्ये मुन्ना कुरणे हे स्वग्रही परतले आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सांगलीचे जुने काँग्रेस नेते आणि सध्याचे भाजपा नेते मुन्ना कुरणे यांनी आज आपल्या सर्व समर्थकांसह भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत मुन्ना कुरणे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक महिन्यापासून भाजपामध्ये मुन्ना कुरणे यांची कोंडी सुरू असल्याची चर्चा होती. त्यामुळे ते पक्षात फारसे सक्रीय देखील नव्हते. अखेर आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुन्ना कुरणे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत डॉक्टर विश्वजीत कदम, सांगलीचे काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुन्ना कुरणे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भाजपाकडे मुन्ना कुरणे यांच्या रुपाने सांगलीत एक मुस्लिम चेहरा होता, मात्र त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये मुस्लिम समाजाला पुरेसे प्रतिनिधीत्व मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कुरणे यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे भाजपचे दोन्ही बडे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच सांगलीमध्ये भाजपला धक्का बसला आहे. मुन्ना कुरणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यानं काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे मात्र भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सांगलीमध्ये भाजपकडून सुधीर गाडगीळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे, तर काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Previous Post

अब्दुल सत्तारांचा प्रताप, शिक्षकांना प्रचाराला पाठवले, निवडणूक आयोगाची थेट कारवाई

Next Post

मोठी ब्रेकिंग | मिरजेत भाजप नेत्याचा निर्घृण खून, आरोपी ताब्यात..! सर्वत्र खळबळ…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | मिरजेत भाजप नेत्याचा निर्घृण खून, आरोपी ताब्यात..! सर्वत्र खळबळ…

मोठी ब्रेकिंग | मिरजेत भाजप नेत्याचा निर्घृण खून, आरोपी ताब्यात..! सर्वत्र खळबळ...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group