• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचाच प्रचार करावा अन्यथा कारवाई केली जाईल..

Admin by Admin
November 7, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचाच प्रचार करावा अन्यथा कारवाई केली जाईल..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • बैठकीत पक्ष निरीक्षकांनी दिला गंभीर इशारा..

सांगली दि.७: सांगली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांची बैठक आज काँग्रेस भवनमध्ये संपन्न झाली. पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ना. एम. बी. पाटील मंत्री कर्नाटक, दयानंद पाटील सरचिटणीस कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी, आमदार बी. आर. पाटील एआयसीसी निरीक्षक , डॉ. सेलीयंथा हातकणंगले निरीक्षक, मा. खा. करणसिंग सांगली विधानसभा क्षेत्र निरीक्षक, आ. गणेश हुक्कीरे हे बैठकीत उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी सांगली मतदारसंघातील प्रचार यंत्रणेचा आढावा सादर केला.ते म्हणाले, ‘अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातून निष्क्रिय महायुतीचे सरकार सत्तेतून हद्दपार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते एकसंध होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत. या कामी लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षक पथक सांगलीत दाखल झाले आहे. अपक्ष उमेदवारांना मदत म्हणजे भाजपाला मदत केल्यासारखे आहे. सांगली जिल्ह्य़ातील व सांगली विधानसभा क्षेत्रातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान व प्रचार कामी सहकार्य करणेचे आहे. माजी नगरसेवक, व काँग्रेस पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी व सदस्य, कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम करावे.

ना. बी. एम. पाटील यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचे काम करणे बंधनकारक राहील. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा गंभीर इशारा दिला. बंडखोरी खपवून घेतली जात नाही. बूथ सक्षम करा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी पक्षासाठी व सांगलीसाठी खूप चांगले काम केल्याने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडून आणणे म्हणजे पक्षाचा विजय होय. बंडखोरीची चर्चादेखील करू नका.

यावेळी करणसिंह, आमदार बी. आर. पाटील व दयानंद पाटील आणि डॉ. सेलिथंना यांनी निवडणूक जिंकण्यासाठी काय करता येईल या विषयावर मार्गदर्शन केले.स्वागत बिपीन कदम तर आभार पैगंबर शेख यांनी मानले.यावेळी सांगली जिल्ह्यातील व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य, विविध आघाडी व सेलचे प्रमुख, महिला आघाडी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते

Previous Post

सांगली ब्रेकिंग | अडीच लाखांचा गांजा जप्त, दोघे ताब्यात एकजण फरार..!

Next Post

अब्दुल सत्तारांचा प्रताप, शिक्षकांना प्रचाराला पाठवले, निवडणूक आयोगाची थेट कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अब्दुल सत्तारांचा प्रताप, शिक्षकांना प्रचाराला पाठवले, निवडणूक आयोगाची थेट कारवाई

अब्दुल सत्तारांचा प्रताप, शिक्षकांना प्रचाराला पाठवले, निवडणूक आयोगाची थेट कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group