नागपूर प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या | नागपूरकरांशी मला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. कारण नागपूर शहरामध्ये आमचे काम बोलते, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. यावेळी राज्यातील भाजपचे सर्वच मोठे नेते उपस्थित होते.

नागपूर आणि विदर्भात परिवर्तन घडवून दाखवले असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूर शहरातील विकास पाहिला तर बदल दिसून येतो. त्यामुळे माझ्यापेक्षा माझे काम बोलत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. विरोधकांबद्दल बोलायची गरज नाही. मी त्याविषयी बोलणार नाही. त्यांच्यासाठी केवळ आमच्या लाडक्या बहिणी पुरेशा आहे, असे देखील फडणवीस म्हणाले. ज्या लाडक्या बहिणींच्या तोंडाचा घास पळवण्यासाठी सुनील केदार आणि नाना पटोले यांनी नागपूरच्या न्यायालयात केस केली. त्या लाडक्या बहिणीच त्यांना पुरुन उरतील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुलींसाठी मोफत शिक्षण असेल, शेतकऱ्यांसाठी मोफत मोफत बीज असेल, दिन, दलित, गरीब, आदिवासी, शेतकरी सर्वांसाठी आम्ही केलेले काम बोलत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ओबीसी समाजासाठी 48 जीआर काढणारे महायुतीचे सरकार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारचा एक तरी जी आर दाखवावा, असे आव्हान देखील त्यांनी दिले आहे. ओबीसी समाजासाठी आम्ही हॉस्टेल तयार करून दाखवले. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार एकही हॉस्टेल तयार करू शकले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
नागपूर जिल्ह्यामध्ये तीन उमेदवारी अर्ज दाखल होत असताना आणखी तीन आमदार आमच्या सोबत येणार असून मुंबईतील विधानभवनात नागपूरचा आवाज बुलंद होणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकवणार असल्याचा दावा देखील यावेळी फडणवीस यांनी केला.

