• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सांगलीत ठाकरेंना नको होतं तेच झालं… ‘मविआ’तील विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब! वाचा सविस्तर…!

Admin by Admin
April 22, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीत ठाकरेंना नको होतं तेच झालं… ‘मविआ’तील विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब! वाचा सविस्तर…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा शेवटी सुटलाच नाही. काँग्रेसकडून इच्छुक असणारे उमेदवार विशाल पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीही विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज कायम ठेवला.

आज (22 एप्रिल) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र, विशाल पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. अर्ज मागे घेण्याची वेळ ही आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. तोपर्यंत विशाल पाटील यांचं मन वळविण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू होता. मात्र शेवटपर्यंत विशाल पाटील हे त्यांच्या मतावर ठाम राहिले. त्यामुळे आता सांगलीत तिरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे. पण यामुळे जे उद्धव ठाकरेंना नको होतं तेच झालं आहे. मविआमध्ये बंडखोरी होऊ नये अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती. पण सांगलीत बंडखोरी झाल्याने ठाकरे नाराज होण्याची शक्यता आहे.

सांगलीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच पक्षाने पुन्हा तिकीट दिलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वाटेला गेल्याने तिथे त्यांच्याकडून चंद्रहार पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर काँग्रेसमध्ये असलेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटील यांना या निवडणुकीसाठी लिफाफा हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे आता या चिन्हावर निवडणूक लढवत मतदारांपर्यंत पोहचविण्याचं मोठं आव्हान विशाल पाटलांसमोर असणार आहे.

काँग्रेसकडून विशाल पाटलांवर कारवाई होणार?

विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची डोकेदुखी ही वाढली आहे. कारण त्यांना शिवसेनेला असं पटवून द्यावं लागेल की, ते विशाल पाटलांना कोणत्याही प्रकारची मदत करत नाहीत. आम्ही त्यांच्या उमेदवारीच्या विरोधात आहोत. पक्षाचा आदेश डावलून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. याच कारणामुळे काँग्रेसला त्यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे आता विशाल पाटील यांच्यावरील कारवाई ही अटळ आहे.

उद्धव ठाकरे काय करणार?

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही मतदारसंघात बंडखोरी होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे हे आग्रही होते. मात्र, तरीही सांगलीत जी बंडखोरी झाली त्यामुळे उद्धव ठाकरे हे नाराज असल्याचं बोललं जात आहे.जरी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली तरी याबाबत उद्धव ठाकरेंची समजूत काढण्याच कामंही काँग्रेस नेतृत्वाकडे आहे. त्यामुळे आता या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाच जणांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे

दरम्यान, सांगली लोकसभेच्या निवडणुकीतून पाच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहे. यात रेणुका प्रकाश शेंडगे, बापू तानाजी सूर्यवंशी, दिगंबर गणपत जाधव, प्रतीक प्रकाशबापू पाटील, सुरेश तुकाराम टेंगले या पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागून राहिलेली सांगली लोकसभा मतदारसंघात अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे आत ही निवडणूक तिरंगी होणार आहे.

Previous Post

मोठी बातमी | सांगलीत संभाजी भिडे यांनी फडणवीसांच्या कानात सांगितलं..? चर्चांना उधाण

Next Post

मोठी ब्रेकिंग | मिरज तालुक्यातील ‘ही’ कार्यकारणी बरखास्त, विशाल पाटील यांना पाठिंबा.. वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी ब्रेकिंग | मिरज तालुक्यातील 'ही' कार्यकारणी बरखास्त, विशाल पाटील यांना पाठिंबा.. वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group