• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत मनसे कडून मुस्लिम धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

Admin by Admin
April 26, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगलीत मनसे कडून मुस्लिम धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून दिलेल्या अल्टिमेटमवरून हिंदू – मुस्लीम तणावाचे वातावरण निर्माण झालेले असताना, मनसेकडून आता सांगलीमध्ये मुस्लीम धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्षांकडून जाहीर करण्यात आले. तसेच, ठरल्याप्रमाणे हनुमान चालीसा देखील लावणार असल्याचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.

त्याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील मनसेकडून करण्यात आला.

मनसेकडून होणार इफ्तार पार्टी – मनसेचे नेते राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. यावरून राजकारण तापले आहे. राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत 3 तारखेचा अल्टीमेटम देखील दिला आहे. यावरून राज्यात हनुमान चालीसा विरुद्ध आजान अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना आता सांगलीमध्ये मनसेकडून मुस्लीम धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगली मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर, राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनुसार तीन तारखेनंतर हनुमान चालीसा लावण्यात येईल, मात्र कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही, असा विश्वास देखील तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांचा कोणत्याही धर्माला विरोध नसून मुस्लीम धर्मीयांच्या बाबतीत त्यांनी विरोध दर्शवला नाही. फक्त भोंगा मुद्दा हा सामाजिक असल्याचे सांगत विरोध दर्शवला आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक महाराष्ट्रात द्वेष पसरून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करण्यात येत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर सांगलीच्या मनसे संघटनेमध्ये सर्व समाजाचे नेते आहेत दलित, मुस्लीम त्याच्यबरोबर आणि समाजातल्याही नेत्यांचा समावेश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

आदिवासी पारधी समाजाच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी बेमुदत राहुटी आंदोलन करणार – सुधाकर वायदंडे यांचा इशारा

Next Post

सांगलीत संभाजी भिडे गुरुजींचा अपघात, सायकलवरून पडल्याने गंभीर जखमी..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत संभाजी भिडे गुरुजींचा अपघात, सायकलवरून पडल्याने गंभीर जखमी..

सांगलीत संभाजी भिडे गुरुजींचा अपघात, सायकलवरून पडल्याने गंभीर जखमी..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group