• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आदिवासी पारधी समाजाच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी बेमुदत राहुटी आंदोलन करणार – सुधाकर वायदंडे यांचा इशारा

Admin by Admin
April 26, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
0
आदिवासी पारधी समाजाच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी बेमुदत राहुटी आंदोलन करणार – सुधाकर वायदंडे यांचा इशारा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसना बाबत कोणतीही ठोस अंलबजावणी न झालेस दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्यावतीने संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत राहुटी आंदोलन करणार असल्याचा इशारा दलित महासंघ युवक आघाडी अध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन दलित महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना दिले यावेळी शिराळा पोलिस ठाण्याचे पो.निरीक्षक श्री.सुरेश चिल्लावर उपस्थित होते.श्री शिंदे यांनी तत्काळ गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून घरकुलाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.

सुधाकर वायदंडे म्हणाले,दलित महासंघाच्या वतीने प्रा.मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पारधी पुनर्वसनासाठी गेली 20 वर्ष महाराष्ट्रभर लढा चालू आहे परंतु वाळवा व शिराळा तालुक्यातील प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पारधी समाजाचे पुनर्वसन रखडले आहे राज्यभर पारधी पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना होत असताना शिराळा व वाळवा तालुक्यातील पारधी समाज सर्व योजनांपासून वंचित राहिला आहे.

वायदंडे म्हणाले,ज्या लोकांना गावे दिलेली आहेत त्या लोकांना अद्यापही घरकुलाचा किंवा इतर कोणताही लाभ मिळालेला नाही. अजूनही काही लोक उघड्यावर राहत आहेत अशा लोकांचे गावामध्ये पुनर्वसन नाही. प्रत्येक वेळी प्रशासनाने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे.परिणामी पारध्यांना गावातून हाकलण्याचे प्रकार चालू आहेत. यासाठी पारधी पुनर्वसनाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून ठोस अमलबजावणी करण्याची गरज आहे.
म्हणून पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसनासाठी ठोस अंलबजावणी झाली नाही तर शिराळा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत राहुटी आंदोलन करणार असल्याचा इशारा सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.

निवेदनावर सुधाकर वायदंडे,पोपटराव लोंढे,दिनकर नांगरे,वैभव शिंदे,टारझन पवार,दीपक पवार,राकेश काळे,रोशना पवार,जहांगीर पवार,धर्मेंद्र काळे,गणेश पवार यांच्या सह्या आहेत.

Previous Post

ब्रेकींग: अखेर ‘त्या’ शिवसेना पदाधिकाऱ्याला अटक

Next Post

सांगलीत मनसे कडून मुस्लिम धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत मनसे कडून मुस्लिम धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

सांगलीत मनसे कडून मुस्लिम धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group