• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | म्हैसाळजवळ १७ लाखाचा गुटखा, सुगंधी तंबाखू साठा पोलिसांच्या ताब्यात

Admin by Admin
April 10, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – म्हैसाळ ते मिरज रस्त्यावर सुगंधी तंबाखू, गुटखा तस्करी करणाऱी पिकअप स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडून १७ लाख ३० हजाराचा माल जप्त केला. पिकअपसह २५ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करून मधुसुदन महेश मगदूम (वय २२, रा.हसनी आश्रम नजीक, श्रीरामनगर, विजयनगर सांगली ) याला अटक केली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस पथकाला म्हैसाळ ते मिरज रस्त्यावरुन एका पिकअपमधून शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा यांनी चोरुन विक्री करण्यासाठी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी परिसरात सापळा लावला होता. सायंकाळी ५ च्या सुमारास पिकअप (एमएच ०८ एपी ५०४७) भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यावर चालकाने रस्त्याकडेला वाहन थांबविले. पोलिसांनी तपासणी केली असता आतमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा असल्याचे निदर्शनास आले. त्यासंदर्भात चालक मधुसूदन मगदूम याच्याकडे विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली.

पोलिस चौकशीत चालक मगदूम याने कर्नाटकातील कुडची येथील प्रोपायटर पाटील ( पूर्ण नाव माहिती नाही) याच्या गोदामामधून भरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच स्वप्नील प्रभाकर लुगडे (रा. समतानगर, गल्ली क्र. १४, मिरज ) याच्या सांगण्यावरुन हा माल तेथे भरुन समतानगर येथे पोहचविण्यात येणार असल्याची कबुली दिली. संशयित मगदूम याच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी संकेत मगदूम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, कर्मचारी अमोल लोहार, आमसिद्ध खोत, अमोल ऐदाळे, अमर नरळे, संजय कांबळे, सोमनाथ गुंडे, सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते, सुनिल जाधव, सूरज थोरात, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.

दोन दिवसात मोठी कारवाई-

अंकली फाट्यावर १४ लाख ८१ हजाराची सुगंधी तंबाखू, गुटखा, पानमसाला याचा साठा सांगली ग्रामीण पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर गुन्हे अन्वेषणच्या पथकाने म्हैसाळजवळ १७ लाख ३० हजाराचा साठा जप्त केला

Previous Post

मोठी ब्रेकिंग | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत गाडीचा चुराडा..

Next Post

ब्रेकिंग | पलूसमध्ये ‘या’ पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर चाकूहल्ला..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

ब्रेकिंग | पलूसमध्ये 'या' पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर चाकूहल्ला..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group