कोल्हापुरातील रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील असणा-या आरपीआयमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. आरपीआयमधील एका गटाने शाहू महाराज छत्रपती यांच्या विराेधात उमेदवार देण्याची घाेषणा केली आहे. हा निर्णय आगामी काळात महायुतीसाठी अडचणीचा विषय ठरणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
कोल्हापुरात आरपीआय (ए) दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली यापुढच्या काळात काम करणार असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. अनेक कार्यकर्त्यांनी आठवले यांची साथ सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात आरपीआयने रूपा वायदंडे यांची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. आरपीआय (ए) गटाचे दीपक निकाळजे म्हणाले या पुढे जातीयवादी पक्षाच्या सोबत जाणार नाही. कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह राज्यात 10 जागांवर निवडणूक लढविणार आहे.

