Manoj Jarange Patil । बीड : नुकतीच जरांगे पाटील यांनी बीड जाहीर सभा घेतली, त्यावेळी त्यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल तर आपल्याला निवडणुकीचे काही देणेघेणे नाही, पण जर आरक्षण दिल नाही तर पुढील विधानसभा निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली. अशातच जरांगे पाटलांचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
“सध्या आंदोलनात सहभागी लोकांना फोडण्याचे काम सुरू आहे. एका व्यक्तीला 15 लाख रुपयांचे आमिष दिले जात आहे. असे असेल तर दोन तासात मराठे तब्बल 5 हजार कोटी रुपये जमा करतील. मराठा समाजाला आरक्षण द्या. आम्ही मागील दीड महिन्यांपासून वाट पाहतोय. तरी एसआयटी काही येईना. बीडमध्ये एसपी यांनी जेसीबीवर गुन्हा दाखल केले असून बीडचे एसपी कोतवालाचे काम करत आहेत,” असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.
पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “माझे व्हिडिओ तयार करून मला बदनाम करू शकतात. मला खेटायचे असेल तर कायद्याने खेटा. कोणीही येणाऱ्या निवडणुकीत आमच्या गाडीला स्टीकर लावू नये. आणि तो कोणी लावूनही घेऊ नका. आपलं वाईट झालं तरीही तुम्हाला राग चीड का येत नाही? सहा करोड मराठे तुम्ही काय कामाचे?,” असा सवालही मनोज जरांगे यांनी विचारला आहे.

