• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Big Breaking | विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी ‘हे’ मुंबईत.! अंतिम निर्णय आज दिल्लीत..? काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे अतिक्रमण..?

Admin by Admin
March 27, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
Big Breaking | विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी ‘हे’ मुंबईत.! अंतिम निर्णय आज दिल्लीत..? काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे अतिक्रमण..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सांगलीची जागा अतिक्रमणात ? समोर ठाकरेंची शिवसेना दक्ष, एकीकडे आग्रही काँग्रेस पक्ष अन् त्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष..? दिल्लीचा निर्णय आज होणार सर्वासमक्ष..!

सांगली प्रतिनिधी | ✒️ संकेतराज बने | खबऱ्या ऑनलाईन – सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असताना ठाकरे शिवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांची एकतर्फी उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस आक्रमक झाली असून जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे आता दिल्लीच्या आजच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

सांगली लोकसभेसाठी भाजपने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर करून आठ दिवस झाले तरी महाविकास आघाडीमध्ये ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. असे असताना दि.२१ मार्च रोजी मिरजेतील जनसंवाद मेळाव्यात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पैलवान पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर ठाकरे शिवसेनेचे अतिक्रमण परतवून लावण्यासाठी काँग्रेसची सर्व जेष्ठ नेते मुंबईत तळ ठोकून आहेत.

माजी राज्यमंत्री आ. डॉ. विश्‍वजित कदम, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका जयश्री पाटील यांच्यासह उमेदवारीसाठी इच्छुक असलेले प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आदी मुंबईत तळ मारून आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगली ही परंपरागत काँग्रेसची जागा असल्याने ठाकरे शिवसेनेने उमेदवार कसा जाहीर केला असा सवाल करत कोणत्याही स्थितीत सांगलीमध्ये काँग्रेसचाच उमेदवार असेल असे सांगितले. तर याबाबतचा अंतिम निर्णय आज दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असून या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | महापालिका अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तपदी ‘यांची’ नियुक्ती.. वाचा सविस्तर

Next Post

उदगाव येथे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना भीषण आग

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
उदगाव येथे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना भीषण आग

उदगाव येथे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना भीषण आग

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group