• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज – पंढरपूर मार्गावर बुलेट- कारचा अपघात, पोलीस जागीच ठार

Admin by Admin
April 18, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज – पंढरपूर मार्गावर बुलेट- कारचा अपघात, पोलीस जागीच ठार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर (Miraj Pandharpur Highway) चारचाकी आणि बुलेट अपघातात (Accident) बुलेटस्वार पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर, या भीषण अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. महामार्गावरील शिरढोन जवळ हा अपघात झाला आहे.

कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) येथील चार चाकी वाहनाची बुलेट (Bullet) मोटरसायकलला जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात प्रवीण बाबाराम सोनवणे (वय ४३) या पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.

प्रवीण सोनवणे हे बुलेट मोटरसायकलवरून सांगोल्याहून (Sangola) सांगलीकडे (Sangli) निघाले होते. तर चार चाकी वाहन मिरज हून सोलापूर कडे निघाले होते. दरम्यान, उत्तम सिमेंट कारखाना जवळ असलेल्या पुलावर आले असता समोरून येणाऱ्या बुलेट मोटर सायकलला चारचाकी वाहनांची जोराची धडक बसली. यात प्रवीण सोनवणे यांना डोक्याला आणि पायाला जोराचा मार लागल्याने जागीच ठार झाले. तर, जखमींवर कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Previous Post

“३ तारखेपर्यंत भोंगे बंद झाले नाहीत तर….,राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे..!”

Next Post

सांगली | राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली | राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group