• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वकील आणि न्यायाधीशांनी न्याय शोधला पाहिजे : न्यायमूर्ती कोतवाल

Admin by Admin
February 5, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
वकील आणि न्यायाधीशांनी न्याय शोधला पाहिजे : न्यायमूर्ती कोतवाल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विटा प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – विट्यात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधिश प्रदीप शर्मा, विट्याच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधिश डी. वाय.गौड, विटा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. सचिन जाधव उपस्थित होते. यावेळी बोलताना आपण न्यायालयात न्याय देत नाही, तर न्याय शोधून देतो. त्यामुळे वकील आणि न्यायाधीशांनी न्याय शोधला पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी व्यक्त केले.

विट्यात न्यायालय झाल्यामुळे वेळेची बचत : न्यायमुर्ती सारंग कोतवाल

यावेळी न्यायमुर्ती सारंग कोतवाल म्हणाले, बऱ्याच वर्षाची मेहनत घेतल्यानंतर विट्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू होत आहे. हा केवळ कार्यक्रम नाही, तर चांगल्या दिवसांचा प्रारंभ आहे. २९ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आजचा दिवस आला आहे. दिरंगाई झाली तर यातून लोकांचे प्रश्न पुढे येत असतात. विट्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय होत असताना इतर तालुक्यातील बार कौन्सिलनी पाठबळ दिले, हे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सांगली बार कौन्सिलचेही तुम्ही विशेष आभार मानले पाहिजेत. येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय झाल्यामुळे सर्वात जास्त चांगले काम काय होणार तर वेळेची बचत होणार आहे. एखाद्या फौजदारी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाली किंवा दिवाणी प्रकरणात ताबा घेण्याच्या विषयात वेळेला फार महत्त्व असते. अशावेळी विट्यात न्यायालय झाल्यामुळे वेळेमुळे होणारे नुकसान टळणार आहे. त्याचा फायदा पक्षकारांना होणार आहे. शेवटी आपण सर्वजण पक्षकारांसाठी काम करीत असतो. वास्तविक पाहता दोन बाजूचे दोन पक्षकार न्यायालयात येतात, तेव्हा खरं आणि खोटं काय आहे, हे त्या दोन्ही पक्षकारांना माहित असते. अशावेळी दोन्ही पक्षकारांचे वकील आणि न्यायाधीश यांनी एक टीम म्हणून सत्य शोधण्यासाठी काम केले पाहिजे असेही न्यायमूर्ती कोतवाल यांनी सांगितले.

न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा : न्यायाधिश प्रदीप शर्मा

प्रदीप शर्मा म्हणाले, विट्यातील न्यायालयामुळे चार तालुक्यातील पक्षकारांची सोय होणार आहे. पक्षकारांना अर्थिक भुर्दंड बसू नये आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी हे न्यायालय उपयुक्त ठरणार आहे. पक्षकार आणि वकील अशा दोघांचाही वेळ आणि पैसा वाचणार आहे. शिवाय न्यायालयातील प्रकरणांचा जलद निपटारा होईल. या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात २ हजार ५२४ प्रकरणे वर्ग करण्यात आल्याचेही शर्मा यांनी सांगितले.

बार कौन्सिलचे वातावरण सौहार्दपूर्ण राहील : अॅड. सचिन जाधव

अॅड. सचिन जाधव म्हणाले, विटा बार कौन्सिलची निवडणूक झाल्यानंतर दोन दिवसांनीच आम्ही मुंबईला गेलो, तेव्हा माझी ओळख माझ्या विरोधात लढलेले अॅड, उदय यादव यांनी व्यासपीठावर आता असलेल्या लोकांशी करून दिली. इतके चांगले वातावरण विटा बार कौन्सिलमध्ये आहे. आम्हाला पलूस, कडेगांव आणि आटपाडी बार कौन्सिलनी चांगले पाठबळ दिले. जिल्ह्यातील सर्व न्यायमुर्तीनी चांगले मार्गदर्शन केले, त्यामुळे आजचा दिवस उजाडला आहे, असेही अॅड. जाधव म्हणाले. स्वर्गीय आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यासह चार तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे योगदोन असल्याचे सांगत पुढेही बार कौन्सिलचे वातावरण सौहार्दपूर्ण राहिल, असा विश्वास अॅड.जाधव यांनी व्यक्त केला.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | विक्रीच्या प्रयत्नात असताना तीन देशी पिस्तूल जप्त

Next Post

वृद्ध मातापित्याचे संगोपन सक्तीचे करणाऱ्या नरवाड ग्रामपंचायतीची निलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वृद्ध मातापित्याचे संगोपन सक्तीचे करणाऱ्या नरवाड ग्रामपंचायतीची निलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

वृद्ध मातापित्याचे संगोपन सक्तीचे करणाऱ्या नरवाड ग्रामपंचायतीची निलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group