• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापूर ‘उत्तर’ च्या निकालानंतर विजयी मिरवणुकीवर बंदी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त..

Admin by Admin
April 16, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
कोल्हापूर ‘उत्तर’ च्या निकालानंतर विजयी मिरवणुकीवर बंदी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूक मतमोजणी आज, शनिवारी राजाराम तलाव परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीत होत आहे.

या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर व मतमोजणी केंद्राबाहेर फटाके, गुलाल उधळण्यासही मनाई करण्यात आली आहे. याबाबत उमेदवारांना सूचना देण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. काही मार्ग एकेरी केले आहेत. उमेदवारांच्या समर्थकांना थांबण्यासाठी जागा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. निकालानंतर उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सकाळपासून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. जयश्री जाधव यांनी आघाडी घेताच पालकमंत्री सतेज पाटलांचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा बावडा मतदारसंघात जयश्री जाधवांच्या विजयाचे पोस्टर झळकले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पोलिसांची नजर राहणार आहे.

बंदोबस्त असा

पोलीस उपअधीक्षक : २
पोलीस निरीक्षक : ६
पोलीस उपनिरीक्षक : १०
पोलीस कर्मचारी : १३०
होमगार्ड : १००
आरसीपी : १ तुकडी
सीआयएसएफ : २ तुकडी
एसआरपीएफ : १ तुकडी

Previous Post

कॉंग्रेस, भाजपाकडून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप, निवडणुक रद्द करण्याची करुणा शर्मांची मागणी..

Next Post

कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांचे साधूच्या वेशातील फोटो असलेले मिम्स वायरल..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांचे साधूच्या वेशातील फोटो असलेले मिम्स वायरल..

कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांचे साधूच्या वेशातील फोटो असलेले मिम्स वायरल..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group