पुणे: खबऱ्या प्रतिनिधी / मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ तरुण मृतावस्थेत सापडला. तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही.
सौरभ रुपेश शिंदे (वय २३, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रुपेश (वय ४९) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. सौरभच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. खुनामागचे कारण समजू शकले नाही. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.