• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | सिव्हिल हॉस्पिटलसमोर दागिने विक्रीचा होणारा सौदा एलसीबी पोलिसांनी उधळला..? रेकॉर्डवरील “खल्या’चा ऐन दिवाळीत पोलिसांनी धमाका फोडला..!

Admin by Admin
November 14, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरज | सिव्हिल हॉस्पिटलसमोर दागिने विक्रीचा होणारा सौदा एलसीबी पोलिसांनी उधळला..? रेकॉर्डवरील “खल्या’चा ऐन दिवाळीत पोलिसांनी धमाका फोडला..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / मोहोळ (जि. सोलापूर) येथील रेकाॅर्डवरील गुन्हेगार यल्लाप्पा उर्फ खल्या आदरक शिंदे (वय ४२) हा सोन्याचांदीचे दागिने विकण्यासाठी आला असता सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडले.

त्याच्याकडून सहा लाख ७३ हजार रुपये किंमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. सांगलीसह सोलापूर जिल्ह्यात दिवसा व रात्री घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली आहे.

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घरफोडीतील गुन्हेगारांच्या शोधासाठी सहाय्यक निरीक्षक सिंकदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त केले होते. या पथकातील काॅन्स्टेबल राजू शिरोळकर यांना यल्लापा शिंदे हा चोरीतील दागिने विक्रीसाठी मिरज सिव्हिल रुग्णालय परिसरातील बसवेश्वर उद्यानाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने मिरज सिव्हिल रुग्णालय परिसरात सापळा लावला.

यल्लाप्पा हा पिशवी घेऊन उद्यानासमोर उभा असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले. पोलिसांनी दागिन्याबाबत विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. पथकाने त्याच्याकडून ६ लाख किंमतीचे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ७३ हजार रुपये किंमतीचे एक किलो चांदीचे दागिने असा ६ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

Previous Post

ब्रेकिंग | जतमध्ये सोने खरेदी फसवणूकीच्या गुन्ह्यात वाढ; आणखी एका महिलेची ९ लाखांची फसवणूक..

Next Post

कोल्हापूरात खळबळ..! तासाभरात दोन खून..! भीतीचे वातावरण..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोल्हापूरात खळबळ..! तासाभरात दोन खून..! भीतीचे वातावरण..?

कोल्हापूरात खळबळ..! तासाभरात दोन खून..! भीतीचे वातावरण..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group