• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | जतमध्ये सोने खरेदी फसवणूकीच्या गुन्ह्यात वाढ; आणखी एका महिलेची ९ लाखांची फसवणूक..

Admin by Admin
November 14, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | जतमध्ये सोने खरेदी फसवणूकीच्या गुन्ह्यात वाढ; आणखी एका महिलेची ९ लाखांची फसवणूक..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या प्रतिनिधी / जत येथे स्वस्तात सोने देतो म्हणून फसवणूक केलेले रॅकेट मोठे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंध्र प्रदेशमधील व्यापाऱ्याच्या फसवणूक प्रकरणानंतर आणखी एका महिलेची सोने खरेदीमध्ये फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

याबाबतची फिर्याद जत पोलिसात दाखल झाली आहे. तालुक्यात यापूर्वी साडेसव्वीस लाखाच्या सोने फसवणूक प्रकरणानंतर रेवनाळ येथे हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद पद्मिनी पांडुरंग गावडे (रा. रेवनाळ) यांनी जत पोलिसात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रेवनाळ येथील पद्मिनी पांडुरंग गावडे या महिलेने फसवणूक झालेल्या महिलेने स्वस्तात सोने देतो म्हणून मेहबूब शेख व दर्याप्पा यलापा हवीनाळ या दोघांनी ९ लाखाची फसवणूक केल्याची फिर्याद दिली. स्वस्तात सोने देतो म्हणून पैसेही घेतले परंतु सोने व पैसे परत दिले नाहीत. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर गावडे यांनी मेहबूब रमजान शेख, (रा. एमआयडीसी जत), दर्याप्पा यल्लाप्पा हवीनाळ (रा. विठ्ठल नगर, जत) या दोघांच्या विरोधा जत पोलिसात तक्रार दिली. यापूर्वीच्या साडेसव्वीस लाखांच्या सोने फसवणूक प्रकरणात सध्या हे दोघेही पोलीस कोठडीत आहेत. जत तालुक्यातील सोने फसवणूक प्रकरणात दाखल झालेल्या या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधे करीत आहेत.

यापूर्वी साडेसव्वीस लाखांच्या सोने फसवणूकीने तालुक्यात खळबळ

२ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील एका व्यापाऱ्यास जत येथील पाच जणांनी स्वस्तात सोने देतो म्हणून फसवणूक केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. याच प्रकरणात पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी तिघे पोलीस कर्मचारी निलंबित केले आहेत. दरम्यान पोलीस उपाधीक्षक सुनिल साळुंखे यांनी अशा प्रकारची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले होते.

Previous Post

सांगलीतील बहुचर्चित हिसडा गँगचा चोरटा निघाला राधानगरीचा !

Next Post

मिरज | सिव्हिल हॉस्पिटलसमोर दागिने विक्रीचा होणारा सौदा एलसीबी पोलिसांनी उधळला..? रेकॉर्डवरील “खल्या’चा ऐन दिवाळीत पोलिसांनी धमाका फोडला..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज | सिव्हिल हॉस्पिटलसमोर दागिने विक्रीचा होणारा सौदा एलसीबी पोलिसांनी उधळला..? रेकॉर्डवरील “खल्या’चा ऐन दिवाळीत पोलिसांनी धमाका फोडला..!

मिरज | सिव्हिल हॉस्पिटलसमोर दागिने विक्रीचा होणारा सौदा एलसीबी पोलिसांनी उधळला..? रेकॉर्डवरील "खल्या'चा ऐन दिवाळीत पोलिसांनी धमाका फोडला..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group