माहिती विचारता उडवाउडवीची उत्तरे
तासगाव:- तासगाव तालुकयातील तूरची ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार सध्या चव्हाट्यावर आला असून ग्रामपंचायत कर्मचारी गेली तीन महिने झालं आपल्या हक्काच्या पगारापासून वंचित असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे मात्र पगार देण्यास टाळाटाळ का केली जात आहे याबाबत विचारणा केली असता वसूल झाला नसल्याचे कारण सांगितलं जातं आहे . याबाबत पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती विचारली असता ग्रामसेवक थेट उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे समोर आल आहे . गेली तीन महिने कर्मचाऱ्यांना पगार नाही मात्र लोकप्रतीनिधींनीही यात लक्ष घातले नाही काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तुरची ग्रामपंचायत मध्ये कराची वसुली नसल्याने गेली तीन महिन्यांत कर्मचारी पगार दिला नाही. याठिकाणी आत्तापर्यंत केवळ २० टक्केंच्या आसपास वसुली झाली असल्याचे समजते. येथील ग्रामसेवक यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांच्याकडुन उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली .वसुली साठी प्रशासन कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही असा आरोप नियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसेवक यांच्या मूलभूत ४३ कर्तव्या मध्ये कर वसुली हे एक कर्तव्य असून याच कर्तव्याकडे येथील ग्रामसेवक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झालं आहे.
तसेच येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला जात नाही अशी चर्चा आहे . एकंदरीत याठिकाणी अतिशय बेशिस्तपणे भोंगळ कारभार सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ या गोष्टीकडे लक्ष देऊन कारभार सुरळीत करावा अशी मागणी होत आहे .
संबंधित ग्रामसेवक यांना सूचना देण्यात आल्या असून दोन दिवसात कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातील तसेच माहिती मागणाऱ्या किंवा ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सन्मानजनक वागणूक देण्याबाबत ही सूचना देण्यात आल्या आहेत तसेच ग्रामपंचायत संदर्भातील माहिती प्रत्येक व्यक्तीस वेळेवर उपलब्ध करून देण्याबाबत ही सूचना देण्यात आल्या आहेत :- अविनाश मोहिते गटविकास अधिकारी तासगाव