मिरज प्रतिनिधी / मिरजेतील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. बी.कुरणे अध्यक्षस्थानी होते. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इयत्ता अकरावी पासून तयारी करण्याची गरज असल्याचे व विद्यार्थ्यांसाठी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे मत प्राचार्य कुरणे यांनी मांडले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सचिन माळी (संस्थापक भगतसिंह अकॅडमी) यांना निमंत्रित केले होते. प्रा.माळी यांनी पोलीस भरती व आर्मी भरती याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. पी. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सौ. काटकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. के.बी.पाटील यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

