• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इंदापूर: तब्बल ६५ तासानंतर विहिरीतील ढिगाऱ्या खालून पहिला मृतदेह बाहेर; आणखी तिघांचा शोध सुरूच.

Admin by Admin
August 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
इंदापूर: तब्बल ६५ तासानंतर विहिरीतील ढिगाऱ्या खालून पहिला मृतदेह बाहेर; आणखी तिघांचा शोध सुरूच.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इंदापूर : म्हसोबाचीवाडी येथे विहिरीला रिंग तयार करण्याचे काम सुरु असताना मंगळवारी दुपारनंतर अचानक मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार मजूर विहिरीतील मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची दुर्दैवी घटना घडली.

१२० फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चार मजुरापैकी एका मजुराचा मृतदेह आज सकाळी साडेदहाच्या सुमारास बाहेर काढण्यात आला आहे. पण उवरित तिघांची शोध अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या तीन दिवसापासून याठिकाणी बचाव कार्य सुरु होते. विहिरीची खोली जास्त असल्यामुळे बचाव कार्याला मोठी अडचण येत होती. माती व मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (३२), जावेद अकबर मुलाणी ( ३०, मूळ रा.बेलवाडी, हल्ली रा. निंबोडी), परशुराम बनसीलाल चव्हाण (३०), आणि लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत (५५) चौघेजण अडकले होते.

आज सकाळी चौघांचा शोध सुरु केल्यानंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका मजुराचा मृतदेह सुमारे ६५ तासानंतर एनडीआरएफ जवानांना मिळाला. उवरित तिघांची शोध मोहिम सुरु आहे.

दरम्यान, मागच्या दीड ते दोन महिने हे काम सुरू होते आणि अवघ्या दोन ते तीन दिवसांचे काम राहिले होते. या ठिकाणी तब्बल 11 मजूर काम करत होते. मात्र, पौर्णिमा असल्याने गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी सात मजूर गेले होते. हे सात जण कामावर नव्हते, अन्यथा काय घडले असते या नुसत्या कल्पनेनेच गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला.

Previous Post

कोल्हापूर, सांगलीतील गिरणी कामगारांना मुंबई शहरातच घरे द्या -आमदार आबिटकर

Next Post

Maharashtra Police Force : महाराष्ट्र पोलीस दलात मोठे बदल; 1960 नंतर पहिल्यांदाच रचना बदलली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Maharashtra Police Force : महाराष्ट्र पोलीस दलात मोठे बदल; 1960 नंतर पहिल्यांदाच रचना बदलली

Maharashtra Police Force : महाराष्ट्र पोलीस दलात मोठे बदल; 1960 नंतर पहिल्यांदाच रचना बदलली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group