• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापूर, सांगलीतील गिरणी कामगारांना मुंबई शहरातच घरे द्या -आमदार आबिटकर

Admin by Admin
August 3, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
कोल्हापूर, सांगलीतील गिरणी कामगारांना मुंबई शहरातच घरे द्या -आमदार आबिटकर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गारगोटी: सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार गतिमानतेने काम करीत आहे. यामुळेच ‘सर्वसामान्यांचे सरकार’ अशी या सरकारची ओळख झालेली आहे. यामुळेच राज्यसरकारकडून गिरणी कामगारांना देखील मोठी आशा असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरातच घरे द्या अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी प्रश्नाव्दारे केली.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, राज्यसरकारकडून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. घर हे सर्वांचे स्वप्न असते. मुंबईच्या विकासात गिरणी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे पात्र गिरणी कामगारांची यादी तात्काळ निश्चित करून सर्व गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरे लवकरात मिळावी अशी मागणी केली. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच घरे आवश्यक असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच घरे देण्याची आग्रही मागणी केली.

यावेळी बोलताना गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे म्हणाले की, गिरणी कामगारांना हक्काची घरे लवकर मिळावीत यासाठी समिती नेमण्यात आली असून गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्याच्या आणि घरे वाटप करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यामुळे नक्की किती घरे द्यायची आहेत ते समजून त्यापद्धतीने घरांची उपलब्धता निर्माण करता येईल. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्ये घरे देण्यास योग्य ती कार्यवाही करू असे अश्वासित केले.

Previous Post

बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यास गतीने तपासणी मोहिम राबवा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे निर्देश

Next Post

इंदापूर: तब्बल ६५ तासानंतर विहिरीतील ढिगाऱ्या खालून पहिला मृतदेह बाहेर; आणखी तिघांचा शोध सुरूच.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
इंदापूर: तब्बल ६५ तासानंतर विहिरीतील ढिगाऱ्या खालून पहिला मृतदेह बाहेर; आणखी तिघांचा शोध सुरूच.

इंदापूर: तब्बल ६५ तासानंतर विहिरीतील ढिगाऱ्या खालून पहिला मृतदेह बाहेर; आणखी तिघांचा शोध सुरूच.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group