• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बेडग प्रकरणातील ग्रामसेवक निलंबित

कर्तव्यात कसूर केल्याने सीईओ धोडमिसे यांची कारवाई

Admin by Admin
August 2, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली ( प्रतिनिधी) मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडल्या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक बी. एल. पाटील आणि विद्यमान ग्रामसेवक एम. एस. धेंडे यांना निलंबित करण्यात आले. तसे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.

बेडग कमान पाडल्याबाबत सुरेखा कल्लाप्पा कांबळे यांनी दि. ५ जुलैरोजी प्रशासनास निवेदन दिले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.

लोखंडे यांच्यासह मिरजेचे गटविकास अधिकारी यांनी समक्ष भेट देऊन याबाबत माहिती घेतली. तसेच त्यांनी ग्रामपंचायतीकडील कागदपत्रांची तपासणी केली होती. त्यामध्ये संबंधितांनी केलेली कारवाई हो ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ५२ (२ अ) व ५३ (१) नियमानुसार सदोष आहे. त्यामुळे सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक यांना नोटीस दिली होती. सात दिवसांत खुलासा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ग्रामसेवकांनी खुलासा सादर केला आहे. मात्र खुलासा समाधानकारक नसल्याने सीईओ धोडमिसे यांनी ही कारवाई केली.

उच्च न्यायालयात ग्रामसेवकाची धाव

ग्रामसेवक बी. एल. पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. जिल्हा परिषदेच्या कारणे दाखवा नोटिशीविरोधात दावा दाखल केला असून तिच्या आधारे कोणतीही कारवाई करण्यास विरोध दर्शविला आहे. सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्ताधिकारी आणि बेडग ग्रामपंचायतीला नोटिशीच्या प्रती पाठवल्या असल्याची माहिती देण्यात आली.

Previous Post

पाणी द्या अन्यथा कर्नाटकात जाऊ!

Next Post

जुन्या वादातून कोल्हापुरात तरुणावर चाकू हल्ला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले

जुन्या वादातून कोल्हापुरात तरुणावर चाकू हल्ला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group