• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

संभाव्य पूर, आपत्तीस प्रशासन सज्ज, अफवांवर विश्वास ठेवू नये: जिल्हाधिकारी

Admin by Admin
July 26, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
संभाव्य पूर, आपत्तीस प्रशासन सज्ज, अफवांवर विश्वास ठेवू नये: जिल्हाधिकारी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली ( प्रतिनिधी): जिल्ह्यात पाऊस सुरू असून सद्यस्थितीत पूर व आपत्तीजनक, धोकादायक परिस्थिती नाही. संभाव्य आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस, पाटबंधारे, सर्व प्रशासन व इतर सर्व विभाग सतर्क व सज्ज आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. कोणतीही अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून मदत घ्यावी. कोणत्याही अनधिकृत माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन व स्थानिक प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

जिल्ह्यात येणाऱ्या काळात संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनामार्फत निश्चित केलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात, किंवा सुरक्षित ठिकाणी नागरिकांनी स्थलांतरित व्हावे. ही निवारा केंद्र कोठे आहेत याची माहिती नागरिकांनी जाणून घ्यावी. त्याचबरोबर नियमितपणे प्रशासनाच्या संपर्कात रहावे.

सांगली जिल्ह्यामध्ये चार गावातील दरड प्रवण भागाची जिल्हा प्रशासनामार्फत नुकतीच पाहणी करण्यात आली असून तेथे एनडीआरएफमार्फत गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या कोणताही धोका दिसत नसून जर स्थलांतराची गरज पडल्यास त्यांना प्रशासनामार्फत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जाईल. सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. पाणी उकळून प्यावे. जिल्ह्यामध्ये एनडीआरएफचे एक पथक पोहोचले असून त्यांनी पूरपरिस्थितीच्या ठिकाणांची पाहणी केली आहे.

 

स्थानिक लोकांचेही सहकार्य असून आपदा मित्रांचेही प्रशिक्षण झाले आहे. सर्व नागरिकांनी सतर्क रहावे, सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

Previous Post

पुण्यात पतीसमोर पत्नीवर खाजगी सावकाराचा बलात्कार

Next Post

सर्वात मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सर्वात मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस..

सर्वात मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group