• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, तपास सुरू

Admin by Admin
July 23, 2023
in क्राईम
1 min read
0
मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, तपास सुरू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला. यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने दोन पाकिस्तानी नागरिक आरडीएक्सने भरलेला टँकर मुंबईहून गोव्याला घेऊन जात असल्याची माहिती दिली. फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख पांडे अशी सांगितले आहे. या फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. एएनआय वृत्त संस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी धमकी आहे. तीन दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण कक्षालाही धमकी देण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल, अशी धमकी देण्यात आली. एवढेच नव्हेतर योगी आदित्यनाथ यांचे सरकार निशाण्यावर असल्याची माहिती मसेजद्वारे देण्यात आली. याचबरोबर काही ठिकाणी काडतुसे आणि एके ४७ पोहोचल्याचेही सांगण्यात आले होते.

हे प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ५०९ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

नृसिंहवाडीत यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न, भाविकांची मोठी गर्दी

Next Post

निलेवाडी गावचा प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी घेतला आढावा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
निलेवाडी गावचा प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी घेतला आढावा

निलेवाडी गावचा प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी घेतला आढावा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group