• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

” राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवारांचे नाव घ्यावे लागतं, हे भाजपनं शिकवलेलं दिसतं.”

Admin by Admin
April 3, 2022
in माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
” राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवारांचे नाव घ्यावे लागतं, हे भाजपनं शिकवलेलं दिसतं.”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

“जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना हवं आहे. ज्यावेळी १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. यापूर्वी जात ही जातीचा अभिमान होता. परंतु १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी जातीचा द्वेष करायला लावला,” असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

“भाजपचे लोक फुकट प्रसिद्धी मिळवण्यासाठी शरद पवार यांचे नाव नेहमीच घेत असतात. आपली प्रसिद्धी कमी होताना दिसल्यामुळे राज ठाकरेही आता हाच मंत्र अवलंबू लागले आहेत. राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवार यांचे नाव घ्यावे लागते, हे भाजपने शिकवलेले दिसते,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

“बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट होते. इतिहास ना वाचता तो लिहिलाय कोणी हे पाहिलं गेलं. ते ब्राह्मण आहेत, असं म्हणून टीका व्हायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं जात पात सोडून एक व्हा, त्याच महाराष्ट्रात आज जातीपातीवरून भांडणं सुरू आहेत, राजकारण सुरू आहे. जातीतून आम्ही बाहेर पडत नाही, तर हिंदू कधी होणार,” असाही सवाल त्यांनी केला. ज्या महाराष्ट्राची परंपरा वैभवशाली आहे, ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आज जातीत खितपत पडला आहे, असंही ते म्हणाले.

Previous Post

कोल्हापूर-मिरज, सांगली मार्गावरील ‘पॅसेंजर’ दि. १५ एप्रिलपासून पुन्हा धावणार

Next Post

पोलीस कर्मचाऱ्याचा अर्ज पाहून वरिष्ठ अधिकारीही चक्रावले, मॅरेज अनिव्हर्सरीला म्हणाला पश्चाताप दिवस

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलीस कर्मचाऱ्याचा अर्ज पाहून वरिष्ठ अधिकारीही चक्रावले, मॅरेज अनिव्हर्सरीला म्हणाला पश्चाताप दिवस

पोलीस कर्मचाऱ्याचा अर्ज पाहून वरिष्ठ अधिकारीही चक्रावले, मॅरेज अनिव्हर्सरीला म्हणाला पश्चाताप दिवस

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group