• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत पिस्टल, जिवंत काडतुसे व तलवारीसह दोन जणांना अटक

Admin by Admin
April 1, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत पिस्टल, जिवंत काडतुसे व तलवारीसह दोन जणांना अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज /खबऱ्या प्रतिनिधी :- मिरजेतील चिवटे हॉस्पिटलजवळ सोहेल उर्फ फसीउल्लाह हसीउल्लाह शहा (वय २७) व अनिल विलास क्षीरसागर (वय २२) दोघे रा. प्रकाशनगर एकता कॉलनी ६ वी गल्ली कुपवाड रोड सांगली) या दोघांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व मिरजेतील गांधी चौकी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५० हजार रूपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल, २०० रूपयांचे जीवंत काडतूस तसेच ५०० रूपये किंमतीची तलवार असा एकूण ५० हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करणेत आला.

आधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रशांत माळी व आर्यन देशिंगकर यांना मिरजेतील चिवटे हॉस्पिटलजवळ काही अज्ञात इसम अवैध शस्त्रे बाळगून उभे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून या

दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्या दोघांनीही आपली नावे सोहेल उर्फ फसीउल्लाह हसीउल्लाह शहा व अनिल विलास क्षीरसागर असे सांगितले. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून पिस्टल, तलवार व जीवंत काडतुस जप्त करण्यात आले. दोघांनी पिस्टल व तलवार अहमदनगर येथून आणल्याचे सांगितले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो.नि. प्रशांत निशानदार, अरुण औताडे, संदीप नलवडे, हेमंतकुमार ओमासे, चेतन महाजन, संदीप पाटील, सचिन धोत्रे, प्रशांत माळी व आर्यन देशिंगकर यांनी केली. अधिक तपासकामासाठी दोघा आरोपींना मिरज गांधी चौकी पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.

Previous Post

किरीट सोमय्या सहा महिन्यापासून प्रयत्न करताहेत, चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार – हसन मुश्रीफ

Next Post

गुडी पाडव्याचे महत्व काय..? गुडी कशी उभारावी ? : जाणून घ्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गुडी पाडव्याचे महत्व काय..? गुडी कशी उभारावी ? : जाणून घ्या

गुडी पाडव्याचे महत्व काय..? गुडी कशी उभारावी ? : जाणून घ्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group