• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

Admin by Admin
April 6, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | २-३ दिवसांत भाजपचं सरकार येणार ? या केंद्रीय मंत्र्याने केलं सूचक विधान..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली, दि. ६: सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात वाढत असलेल्या seasonal Influenza आजार आणि कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी व उपाययोजना राबविण्याकामी शासनाच्या आरोग्य विभागाने आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करण्याबाबत सूचित केले आहे.

गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी (आठवडे बाजार, एस.टी. स्टॅण्ड परिसर, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे) इत्यादी ठिकाणी सर्व नागरकिांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. तसेच सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

कोविड-19 व Influenza ची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेण्याचा त्रास, निमोनिया, ताप इत्यादी प्राथमिक लक्षणे आहेत. कोविड-19 विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेवाटे त्याचप्रमाणे शिंकणे, खोकणे, हस्तांदोलन इत्यादी कारणामुळे होतो. या आजाराच्या अनुषंगाने 50 वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे आजार असलेल्या तसेच ज्या नागरिकांना यापूर्वी कोविड-19 ची लागण होऊन गेली आहे (post covid) अशा नागरिकांनी वेळोवेळी व जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकताना, खोकताना नाक व तोंडावर रूमाल धरावा. हस्तांदोलन टाळावे, चेहरा, नाक व डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करू नये आणि गरज नसताना गर्दीच्या व बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे.

शासनाच्या निर्देशानुसार या आजाराची व्याप्ती वाढू नये यासाठी सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय/निमशासकीय कार्यालये, तसेच बँका, शाळा, महाविद्यालये इत्यादी मधील सर्व शासकीय विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर दैनंदिन करणे अनिवार्य आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.

Previous Post

ब्रेकींग | तीन हजारांची लाच घेताना एक्साईजचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व कॉन्स्टेबलला रंगेहाथ अटक.

Next Post

“एक्स गर्लफ्रेंड पाहून जळत असेल” आकाश ठोसरच मोठ वक्तव्य

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“एक्स गर्लफ्रेंड पाहून जळत असेल” आकाश ठोसरच मोठ वक्तव्य

“एक्स गर्लफ्रेंड पाहून जळत असेल” आकाश ठोसरच मोठ वक्तव्य

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group