डॉ. स्वाती पवार, प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांची प्रमुख उपस्थिती
कडेगाव :- कवी अशोक पवार यांनी वंचितांचे अंतरंग या काव्यसंग्रहातून भटक्या समाजाच्या वेदना आणि व्यथा मांडल्या आहेत. अनवाणी माणसांच्या जगण्याच्या व्यथा या काव्यसंग्रहातून उलगडल्या आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या परिवर्तनाचा परागंदा आणि निराधार माणसांचे जगण्याचं जग पवार यांच्या कवितेतून पहावयास मिळते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी केले.
शिवणी (ता. कडेगाव ) येथील कै. बापू पवार व के. शांताबाई पवार यांच्या स्मरणार्थ के. बापूराव पवार फाउंडेशनच्या वतीने आयोजित कवी संमेलन व ले पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी कवयित्री डॉ स्वाती पवार होत्या तर कविसंमेलनाध्यक्षपदी प्रा डॉ रामदास नाईकनवरे होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कवी अशोक पवार यांनी लिहलेल्या वंचितांचे अंतरंग’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष दलितमित्र संपतराव पवार यांनी केले. सुत्रसंचालन सुरेश जाधव यांनी केले. सुरेश जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास सरपंच विजया पवार दिलीपराव उर्फ बाळासाहेब पवार, पोलिस पाटील बाळासाहेब पवार, आनंदराव पाटील, सतिश लोखंडे, राहूल विर, अमृतवेलचे धर्मेंद्र पवार आदींसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शांतिनाथ मांगले यांनी सूत्रसंचालन केले. अशोक पवार यांनी आभार मानले.
फोटो ओळ:- शिवणी कवी अशोक पवार लिखित ‘वंचितांचे अंतरंग’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. रणधीर शिंदे, डॉ. स्वाती पवार, प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे, संपतराव पवार अशोक पवार आदी.
कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
दुपारच्या सत्रात प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झाले. संमेलनात विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता सादर झाल्या. यामध्ये किरण शिंदे, सु. धो.मोहिते, रमेश जावीर, सई ज्ञानेश्वर जाधव, राजाराम करांडे, गझलकार सिराज शिकलगार, यशवंत चव्हाण, शांतीनाथ मांगले, निवांत कवळे, वाय. एस. पवार,सुभाष पाटील यांनी कविता सादर केल्या.

