• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सां. मि.कु महानगरपालिकेला समजपत्र देणार :प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली पाहणी.

मैला मिश्रित पाण्यामुळे नागरिक व प्रदूषणाला धोका ; जिल्हा संघर्ष समितीची तक्रार.

Admin by Admin
January 31, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सां. मि.कु महानगरपालिकेला समजपत्र देणार :प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली पाहणी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज खबऱ्या प्रतिनिधी / जिल्हा संघर्ष समितीने १३ जानेवारी २०२३ रोजी मिरज शहरालगत असलेल्या ओढ्यामध्ये कोणतीही प्रक्रिया न करता मैलामिश्रित सांडपाणी सोडण्यात आल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. त्याचा परिणाम हा पर्यावरणास धोका पोहोचत असून, नागरिकांच्या आरोग्यावरती ही होत आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासन जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे कडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व जिल्हा संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी संयुक्तिक पाहणी केली. याचा अहवाल आल्यानंतर लवकरच हरित न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचे जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांनी सांगितले.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2023/01/VID20230131163010.mp4

 

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, क्षेत्र अधिकारी डॉ. गजानन खडकीकर, चालक संभाजी जानकर यांच्यासह जिल्हा संघर्ष समितीचे सल्लागार ओंकार वांगीकर, ज्योतीराम माळी, आर्की. रवींद्र चव्हाण, आसिफ मुजावर उपस्थित होते.

 

“जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने तक्रार प्राप्त झाल्यानंतर पाहणी करण्यासाठी आमच्या कार्यालयाकडून अधिकारी- कर्मचारी यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी भेट दिली. सदरील दोन्ही ठिकाणचे पाण्याचे नमुने घेतले आहेत. हे पाणी काळसर, दूषित, फेसाळ असून याचा वास येत आहे. नमुने संकलित केले आहेत. हे नमुने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येतील. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याची दिशा ठरेल. आज निरीक्षण आढळून आल्यानंतर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला एक समजपत्र देवून व पुढील कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल.”

श्री. नवनाथ अवताडे
(उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ)

Previous Post

भानुसेला राहिले नाही “भान”.! दीड लाखांची लाच घेताना “एसीबी”ने पकडले त्याचे कान..?

Next Post

अपघात : शाळेची बस झाडावर धडकली; चौघे जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अपघात : शाळेची बस झाडावर धडकली; चौघे जखमी

अपघात : शाळेची बस झाडावर धडकली; चौघे जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group