• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

जत -खोजनवाडी येथे एका महिला शिक्षिकेचा शाळेतील दोन शिक्षकांनी मुख्याध्यापकाचा पदभार का देत नाही म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी दोघा शिक्षकांवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता खोजानवाडी येथे घडली. याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Admin by Admin
January 27, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय, विशेष, शैक्षणिक, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Maharashtra Breaking News : मुंबईत टोलेजंग इमारतीला लाग, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबई : मध्य मुंबईतील दादर येथे गुरुवारी रात्री एका उंच इमारतीच्या २२ व्या मजल्यावर मोठी आग लागली आणि नंतर इमारतीच्या इतर भागांमध्ये पसरली, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. आर ए रेसिडेन्सी या 42 मजली निवासी टॉवरच्या 22 व्या मजल्यावर रात्री 8.30 च्या सुमारास बंद फ्लॅटमध्ये आग लागली, असे अधिकाऱ्याने सांगितले. इमारतीच्या 42व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक पॅनेलला लागलेल्या आगीचे कारण लगेच कळू शकले नाही, असे त्यांनी सांगितले.

छत्तीसगडचे बेरोजगारांना मिळणार भत्ता

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट केले की, “मी पुढील आर्थिक वर्षापासून राज्यातील बेरोजगारांसाठी दर महिन्याला बेरोजगारी भत्ता जाहीर करतो. त्यामुळे छत्तीसगडमध्ये बेरोजगारांना मासिक भत्ता मिळणार आहे.

अमेरिकन सैन्याची उत्तर सोमालियामध्ये मोठी कारवाई

उत्तर सोमालियामध्ये इस्लामिक स्टेट (ISIS) चा वरिष्ठ नेता बिलाल अल-सुदानी आणि त्याच्या सुमारे 10 साथीदारांसह अमेरिकन सैन्याने कारवाई केली.

युक्रेनमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू

युक्रेनमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला आहे.

इस्रायली सैन्याकडून 9 पॅलेस्टिनी ठार

जेनिन चकमकीत इस्रायली सैन्याने 9 पॅलेस्टिनी ठार केले आहेत. तर अनेक जखमी झाले आहेत.

आजारावर उपचार नसल्याने पतीची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या

विदिशामध्ये संजीव मिश्रा या व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली. त्याने सोशल मीडियावर एक सुसाईड नोट पोस्ट केली आहे. अनुवांशिक आजाराने ग्रस्त असलेल्या आपल्या मुलांना वाचवू शकला नाही ज्यासाठी उपचार उपलब्ध नाहीत, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

तोतया पोलिसांची आंतरराज्यीय टोळी गजाआड

पाच जणांची आंतरराज्यीय टोळी पोलिसांनी पकडली. ते पोलिसांच्या गणवेशासारखे खाकी कपडे घालायचे आणि नंतर सामान्य लोकांना फसवायचे आणि ट्रेनमध्ये लुटायचे. ही माहिती कानपुरच्या रेल्वे पोलिसांनी दिली.

दक्षिण आफ्रिका आणखी १२ चित्ते भारताला देणार

दक्षिण आफ्रिकेने पुढील दशकात डझनभर आफ्रिकन चित्ता भारतात आणण्यासाठी भारतासोबत करारावर स्वाक्षरी केली आहे.

[1/27, 8:00 PM] आरए रेसिडेन्सी टॉवर येथे कूलिंग ऑपरेशन सुरू, इमारतीत अग्नीशमन यंत्रणा नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित

दादर पूर्व भागातील आरए रेसिडेन्सी टॉवर येथे कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. काल रात्री तिथे आग लागली. तिथे इमारतीची अग्निशमन यंत्रणा कार्यरत स्थितीत नाही, असे बीएमसीचे म्हणणे आहे.

बीआरएस एमएलसी कौशिक रेड्डी यांच्याकडून राज्यपालांविरोधात अपमानास्पद शब्द

बीआरएस एमएलसी कौशिक रेड्डी यांनी तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरली आहे. ते म्हणाले, राज्यपाल कोणत्या राज्यघटनेचे पालन करत आहेत. तुम्ही (राज्यपाल) विधानसभा आणि कौन्सिलमध्ये आमदार आणि एमएलसींनी मंजूर केलेल्या विधेयकांमुळे बसला आहात. केसीआर सरकार हे लोकांकडून निवडले जाते.

महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होणार? पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे नाव चर्चेत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मोठी घडामोड समोर येत आहे. भगतसिंह कोणत्याही क्षणावरून पदमुक्त होऊ शकतात, असे सूत्राने म्हटले आहे. राज्यपाल नियुक्तीत काँग्रेसमधून पडून बाहेर पडलेले अमरिंदर सिंग यांचे नाव सध्या चर्चेत आले आहे.

भिवंडीत दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, दुसरा बचावला

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात शुक्रवारी पहाटे दोन मजली इमारत कोसळल्याने एका 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य एकाला वाचवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील खाडीपार परिसरात पहाटे ३.३० च्या सुमारास ही घटना घडली, असे त्यांनी सांगितले.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बैठक होणार

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. बैठकीत आगामी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट निश्चित करण्यात येणार आहे.

सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन नोकऱ्या देण्याच्या नावाखाली हजारो तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

चीन आणि दुबई येथील आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन नोकऱ्या देण्याच्या नावाखाली हजारो तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिल्ली, गुरुग्राम आणि फतेहाबाद येथे छापे टाकून 3 जणांना अटक केली आहे.

नांदेड जिल्ह्यात सैराटसारखी घटना? मुलीची कुटुंबियांनी केली हत्या

नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी महिपाल येथे कुटुंबीयांनीच मुलीची हत्या करून मृतदेह जाळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आई वडील दोन भावासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ऑनर किलिंगचा प्रकार असल्याची शक्यता होत आहे.

ईश्वरानंदपुरी स्वामींनी केली टीका, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हातातून काढून घेतला माईक

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेंगळुरूमधील नागरी समस्यांवरील त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी एका कार्यक्रमादरम्यान ईश्वरानंदपुरी स्वामींकडून माईक घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, केवळ आश्वासने देणारे नसून या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी निधी दिला आहे.

सिंधू जल करारावरून भारताने पाकिस्तानला पाठविली नोटीस

भारताने सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करार (IWT) मध्ये फेरफार करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. 25 जानेवारी रोजी सिंधू जल करारासाठी संबंधित आयुक्तांमार्फत नोटीस पाठवण्यात आली.

प्रजासत्ताक दिनी सिधी येथे महामानवांचा अवमान, दोघांविरोधात गुन्हा दाखल

प्रजासत्ताक दिनी सिधी येथे डॉ भीमराव आंबेडकर, बिरसा मुंडा यांच्या फोटोंची तोडफोड केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पवार भाजपचे असते तर महाविकास आघाडी सरकार आले नसते- खासदार संजय राऊत

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केलेल्या विधानाशी सहमत नाही. पवार भाजपचे असते तर महाविकास आघाडी सरकार आले नसते, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ रिलीज करा…दिग्विजय सिंह पाठोपाठ रशीद अल्वींचे सरकारला आवाहन

सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ रिलीज करा असे म्हणत काँग्रेसचे रशीद अल्वी यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

पिढी बदलते तसे संकल्पही बदलतात- पंतप्रधानांची परीक्षा पे चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये ऑनलाईन पाहत आहेत. पिढी बदलते तसे संकल्पही बदलत असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

फडणवीस यांना अडकवण्याचा कट,अशी चर्चा मी उपमुख्यमंत्री असताना माझ्या स्तरावर झालेली नाही – अजित पवार

देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्लॅन करणाऱ्या मास्टरमाईंडचं नाव जाहीर करणार असल्याचा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे. यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. मी उपमुख्यमंत्री असताना माझ्या स्तरावर अशी कोणतीही चर्चा झाली नाही असे अजित पवार यांनी म्हटले. ते जालन्यात बोलत होते. कोण काय म्हटलंय याला उत्तर द्यायला मी मोकळा नाही असंही अजित पवार यांनी म्हटले.

बागेचे टिपू सुलतान नाव काढून टाका, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मालाड परिसरातील एका बागेला दिलेले टिपू सुलतान हे नाव काढून टाकण्याचे आदेश उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. एमव्हीए सरकारच्या कार्यकाळात या उद्यानाचे नाव देण्यात आले होते. भाजपने या नामकरणाला विरोध केला होता.

ओमर अब्दुल्ला भारत जोडो यात्रेदरम्यान सहभागी

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरमधील बनिहालमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान सहभागी झाले. ते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासोबत दिसले.

एटीएम मशीन फोडून रोकड लुटली, दरोड्याची पद्धत पाहून पोलीस चक्रावले

राजस्थानच्या अजमेरमध्ये काल चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून रोकड लुटली. त्यांनी दोन घटनांमध्ये ८ लाख आणि 30 लाखांचा ऐवज चोरीला गेला. दोन्ही घटनांमध्ये दरोड्याची पद्धत सारखीच त्यामुळे ती एकच टोळी असू शकते असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

पोहण्याचा आनंद जीवावर बेतला; अल्ट्राटेक कंपनीच्या खोल खड्ड्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

प्रजासत्ताकदिनी पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तीन शाळेकरी मुलांचा खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. गडचांदूर येथील अल्ट्राटेक कंपनीच्या या खोल खड्ड्यात काल तिघे मुले पोहण्यासाठी गेले होते. मात्र ते घरी परत न आल्याने ही घटना काल उजेडास आली. आज त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात भूकंपाचे झटके

जळगाव जिल्ह्याला शुक्रवारी सकाळीच भूकंपाचे झटके बसले आहेत. नाशिक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार भुसावळ, सावदा परिसरात आज सकाळी १०.३५ च्या सुमारास ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके जाणवले आहेत. उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. सुदैवाने यामुळे कोणतीही हानी झाल्याची अद्याप माहिती नाही.

45 व्यक्तींना प्रत्येकी 30 हजारांची भरपाई द्या, ग्राहक मंचाचे बांधकाम कंपनीला आदेश

ठाणे जिल्हा ग्राहक वाद निवारण मंचाने बांधकाम कंपनी आणि तिच्या भागीदाराला चपराक लगाली आहे. 1986 मध्ये महाराष्ट्रातील वसई येथे फ्लॅट खरेदी केलेल्या प्रत्येकी 45 व्यक्तींना प्रत्येकी 30,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

खाणीतील लोखंड चोरण्याच्या प्रयत्नात ४ जणांचा गुदमरून मृत्यू

शहडोल येथे कोळसा खाणीत ठेवलेले लोखंड लुटण्याच्या प्रयत्नात 4 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. राजा मुस्लिम नावाच्या व्यक्तीने दरोड्याची योजना आखली होती. आम्ही 4 जणांना वाचवले आणि त्यांना रुग्णालयात नेले पण सर्वांचा मृत्यू झाल्याचे शहडोलचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार प्रतीक यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर हे छोट्या विचारांचे- चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र येणे महाविकास आघाडीला मान्य नाही. आगामी काळात संघटनात्मक काम वाढवू. दोन्ही सेना एकत्र झाल्या तरी भाजपवर परिणाम होणार नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर हे छोट्या विचारांचे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरीत चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

नांदगाव:- नांदगाव तालुक्यातील जातेगाव प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाला असुन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या मतदार संघातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूजा दादासाहेब हिचा मृत्यू झाला आहे.

पूर्ण माहितीशिवाय एखाद्या चित्रपटावर कमेंट करणे चुकीचे – अनुराग ठाकूर

मुंबई – भारतीय चित्रपट आज जगात नाव कमावत आहेत. मग या बहिष्कार प्रकारच्या चर्चेचा विपरित परिणाम होतो. खरेतर वातावरण बिघडवण्यासाठी कधी-कधी लोक पूर्ण माहितीशिवाय कमेंट करतात. त्यामुळे नुकसानही होते, असे होऊ नये, असे मत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.

अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे राज्यपाल बनण्याच्या चर्चेला उधाण

मुंबई – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतरच राज्यामध्ये राज्यपाल बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली होती. हिवाळी अधिवेशनातही राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलने केली. त्यानंतर राज्यपाल बदलले जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यामध्ये सध्या पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे नाव आघाडीवर आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली खासदारांची बैठक

मुंबई – संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ३० जानेवारीला राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलाविली आहे. मंगळवारी ३१ जानेवारीला अधिवेशनाला प्रारंभ होत असताना सोमवारी बैठक आयोजित केल्याबद्दल खासदारांनी आक्षेप घेतला आहे. अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी अनेक खासदार दोन दिवस आधीच दिल्लीत जात असतात. मात्र अधिवेशनाच्या एक दिवस आधी ही बैठक बोलविण्यात आल्याने अनेक खासदारांनी नाराजी व्यक्त केली.

पुण्यात रोजरी स्कूलचे संस्थापक विवेक अरोरा यांच्या कार्यालयावर ईडीचे छापे

पुणे : पुण्यामध्ये ईडीची छापीमारी झाली असून, यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध रोजरी इंग्लिश स्कूल शाळेचे संस्थापक विवेक अरोरा यांच्या कार्यालयावरही इडीने आज सकाळपासून छापेमारी केली आहे. केंद्रीय विभागाचे 18 ते 20 अधिकारी आज सकाळी 8वाजता या शाळेमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा व्यवस्थापकाचे सुरक्षा जवान ही यामध्ये आहेत.

आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवर विषारी फेसाचा थर?*

पुणे – आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवर विषारी फेसाचा थर दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धेश्वर घाटाजवळील स्थानिक रहिवासी आणि भाविकांचे म्हणणे आहे की हा प्रश्न गेल्या 10 वर्षांपासूनचा आहे. गेल्या 4 वर्षात हा प्रश्न चिघळला आहे. तसेच कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही स्थानिक ग्रामस्थ सांगतात.

शालेय पोषण आहारातून 32 विद्यार्थ्यांना विषबाधा; सांगलीतील प्रकार

सांगली – शहरातल्या एका शाळेमधील विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याचे प्रकार घडला आहे. सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहारमधून विषबाधा झाल्याचे समोर आला आहे.

मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता. हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई अन्य 20 जणांची निर्दोष मुक्तता

02 जून 2014 ला पुण्यातील हडपसर भागात मोहसीन शेख या आयटी इंजिनीयरची हत्या करण्यात आली होती. हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह या संघटनेच्या वीस जणांवर मोहसीनच्या हत्येचा आरोप होता. त्यावेळी फेसबुक आणि सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह्य पोस्ट टाकण्यात आल्यानं तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी धंनजय देसाईने त्याच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसमोर चिथावणीखोर भाषण दिल्याने त्याच्या कार्यकर्त्यांनी मोहसीनची हत्या केल्याचा आरोप होता

आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र

मुंबई – आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. टपालातून शेलारांच्या कार्यालयाला धमकीचे बेनामी पत्र मिळाले आहे.

1539 कोटी रुपयांच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी

सातारा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सातारा जिल्ह्यात फलटण येथे 1539 कोटी रुपयांच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. माजी आमदार रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आमदार शहाजीबापू पाटील यावेळी उपस्थित होते.

युवकांचा तलावात बुडून मृत्यू; कान्हेरी ते एरंडा रोडवरील तलावातील घटना

अकोला – मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मजुरांचा कान्हेरी ते एरंडा रोडवरील खोल तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २६) रात्री उशीरा घडली. दोन्ही मृतकांचे शव काढण्यासाठी संत गाडगे बाबा आपात्कालीन व शोध बचाव पथकाचे दीपक सदाफळे यांना कसोसिचे प्रयत्न केले. त्यानंतर दोन्ही मृतदेह खोल तलावातून बाहेर काढण्यात आले. अनिल शन्नीलाल उईके आणि पुष्पेंद्र कनस कुमरे या दोघांचा मृत्यु झाला.

Previous Post

खळबळजनक : सांगलीत ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा : शाळेने दिला होता डाळ भात : सांगली सिव्हील मध्ये उपचार सुरू.

Next Post

प्रजासत्ताकदिनी राज्यातील १८९ कैद्यांची कारागृहातून झाली सुटका

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रजासत्ताकदिनी राज्यातील १८९ कैद्यांची कारागृहातून झाली सुटका

प्रजासत्ताकदिनी राज्यातील १८९ कैद्यांची कारागृहातून झाली सुटका

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group